आधी पत्नीची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले, नंतर सासरच्यांना फोन करून सांगितले...(फोटो सौजन्य-X)
Bengaluru Crime News In Marathi: मेरठमधील सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी हिने प्रियकरासह मिळून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असताना आता बेंगळुरूमध्ये एक भयानक हत्याकांड उघडकीस आला आहे. पतीने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते सूटकेसमध्ये भरल्याची घटना समोर आली. एवढेच नाही तर आरोपीने स्वतः त्याच्या सासरच्यांना फोन करून हत्येची माहिती दिली.
बेंगळुरूच्या हुलीमावू भागात एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून सूटकेसमध्ये भरल्याचा एक भयानक खून प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव राकेश असे आहे, तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे. हत्येनंतर राकेशने स्वतः त्याच्या पत्नीच्या पालकांना फोन करून या भयानक गुन्ह्याची माहिती दिली. मृत महिलेचे नाव ३२ वर्षीय गौरी अनिल सांबेकर असे आहे. राकेश एका खाजगी कंपनीत काम करत होता आणि घरून काम करत होता. तो गेल्या एक वर्षापासून दोड्डाकन्नाहल्ली येथे राहत होता.
महाराष्ट्र पोलिसांकडून माहिती मिळताच हुलीमावू पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपायुक्त (डीसीपी) सारा फातिमा यांनीही घटनास्थळी पोहोचून चौकशी केली. डीसीपी साउथ-ईस्ट यांच्या मते, पती-पत्नी हुलीमावू पोलिस स्टेशन हद्दीत राहू लागले. दोघेही महाराष्ट्राचे होते. मृतदेह पूर्णपणे सुटकेसमध्ये भरलेला होता. घरमालकाने संध्याकाळी ५:३० वाजता आग्नेय पोलिस नियंत्रण कक्षाला याबद्दल माहिती दिली.
गौरीने मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली होती आणि सध्या ती बेरोजगार होती. तर, राकेश एका खाजगी कंपनीत काम करत होता आणि घरून काम करत होता. घरमालक आणि शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. मिळालेल्या माहितीनुसार, गौरीने अनेक वेळा राकेशवर हात उचलला होता. या भांडणांना कंटाळलेला राकेशचा अखेर राग अनावर झाला.
दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. वाद इतका वाढला की रागाच्या भरात राकेशने गौरीच्या पोटावक चाकूने वार केला. त्यानंतर तिचा गळा चिरून खून करण्यात आला. हत्येनंतर, राकेशने गौरीचा मृतदेह एका मोठ्या ट्रॅव्हल सुटकेसमध्ये भरला, तो बाथरूममध्ये सोडून पळून गेला. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.