आयटी इंजिनीअर तरुणीवर अत्याचार (फोटो- istockphoto)
पुणे: आयटी इंजिनिअर तरुणीशी सोशल मिडीयाद्वारे ओळख झाल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखविले. नंतर मात्र तिला कोल्ड्रींक्समधून गुंगीचे ओैषध देऊन मित्राने अत्याचार केला. नंतर त्याच्या तीन मित्रांनी तिच्याशी अश्लीलता करत तिचा अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये उकळले. तसेच, तिचे दोन महागडे मोबाइलही घेतले. मुंबईतील कांदीवली भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली.
याबाबत ३३ वर्षीय पीडित तरुणीने काळेपडळ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून तमीम हरसल्ला खान (रा. कांदिवली, मुंबई) याच्यासह तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. अत्याचाराची घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली. त्यामुळे काळेपडळ पोलिसांनी याप्रकरणाचा तपास कांदिवली पोलिसांकडे वर्ग केला आहे.
माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची कर्नाटकातील आहे. ती एका आयटी कंपनीत नोकरी करते. सध्या ती पुण्यात वास्तव्यास आहे. २०२१ मध्ये तिची आरोपी खान याच्याशी ओळख झाली होती. खानने तिला विवाहाचे आमिष दाखविले. नंतर तरुणी त्याला भेटण्यास कांदिवलीत गेली. कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणीला कारमधून मुंबई, पुण्यात नेले. त्याने तरुणीवर अत्याचार केला.
खानने तीन मित्रांना बोलावून घेतले. त्यांनी तरुणीशी अनैसर्गिक कृत्य केले. आरोपींनी फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून दहा लाख रुपये उकळले. नंतर तरुणीकडे आणखी पैशांची मागणी करत बँकेकडून १८ लाख रुपये कर्ज काढून आरोपींना दिले. आरोपींनी तिच्या क्रेडीट कार्डचा वापर करुन दोन महागडे खरेदी केले. तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने काळेपडळ पोलिसांत तक्रार दिली.
शिक्षणाच्या पंढरीत मुली असुरक्षित! दोन मुलींवर अत्याचार
शिवाजीनगर भागात किरकोळ वस्तूंची विक्री करुन उदरनिर्वाह करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित ४२ वर्षीय मुलींच्या आईने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
शिक्षणाच्या पंढरीत मुली असुरक्षित! दोन मुलींवर अत्याचार; पोलिसांकडून अल्पवयीनांवर गुन्हा दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागातील चौकात प्लास्टिक पिशवी, पेन, तसेच फुले विक्री करण्याचे काम मुली करतात. दोघी चुलत बहिणी आहेत. पीडित मुली आणि त्यांचे कुटुंबीय फिरस्ते असून, ते किरकोळ वस्तुंची विक्री करुन उदरनिर्वाह करतात. या पीडित मुलींच्या मोठ्या बहिणीचा विवाह आरोपी अल्पवयीन मुलांच्या नात्यातील एका तरुणाशी झाला आहे. त्यामुळे मुली आरोपींना ओळखतात. १७ मार्च रोजी अल्पवयीन मुले शिवाजीनगरमध्ये आले. त्यांनी मुलींना बहिणीची भेट घालून देतो, असे सांगून दुचाकीवरून नेले. त्यावेळी आरोपी मुलांची आई तेथे होती. मुलींवर दोघांनी बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला. तसेच, अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.