वसई किल्ल्यात अघोरी कृत्य, मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पिता पुजारी, मुलाला अटक
भाईंदर, विजय काते: दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत जात असल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसात दोन हत्या झाल्याने भाईंदर शहर हादरुन गेले आहे. अवघ्या दोन दिवसांत शहरात दोन वेगवेगळ्या हत्या घडल्या असून, दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.पहिली घटना भाईंदर पश्चिम येथील असून, एका तरुणाने वैयक्तिक वादातून आपल्या मित्राचा कोयत्याने निर्घृण खून केला. ही घटना शहरातील मुर्दा खाडी परिसरात घडली. या प्रकरणातील आरोपीस मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 48 तासांत पुणे येथून अटक केली. पोलिसांनी तांत्रिक पुरावे व सूत्रांच्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवून ही यशस्वी कारवाई केली आहे.
10 जून रोजी रात्री उशिरा, भाईंदर पश्चिम येथील मुर्दा खाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. संजय शर्मा (वय 36) या व्यक्तीने आपल्या 46वर्षीय जुना मित्र अनीस नबी याचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. दोघेही जुने मित्र असून काही दिवसांपूर्वी अनीस नबी काही काळासाठी संजयच्या घरी राहायला आला होता.
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, संजय शर्मा हा पेंटर म्हणून काम करतो आणि मुर्दा खाडी परिसरातील एका चाळीत भाड्याने राहतो. अनीस नबीच्या मुक्कामादरम्यान दोघांमध्ये किरकोळ वाद झाले, परंतु तो वाद इतका टोकाचा गेला की, रागाच्या भरात संजयने घरात असलेल्या कोयत्याने अनीसवर प्राणघातक हल्ला केला. अनीसच्या मानेवर आणि छातीवर वार करण्यात आले आणि जागीच त्याचा जीव गेला .
घटनेनंतर संजय शर्मा फरार झाला. यानंतर भायंदर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासाच्या दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक माहितीचा वापर करून आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढला.
केवळ ४८ तासांच्या आत मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून संजय शर्माला ताब्यात घेतले. सध्या आरोपीकडून चौकशी सुरू असून, खुनामागील नेमका वाद काय होता, याचा शोध घेतला जात आहे. विशेष बाब म्हणजे संजय आणि अनीस यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे 12 जून रोजी भाईंदर पूर्वेकडील कनकिया म्हाडा वसाहतीत 24 वर्षीय युवकाने आपल्या प्रेयसीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. करिश्मा (पूर्ण नाव गोपनीय) असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल वार केल्यामुळे ती जागीच ठार झाली.
या प्रकरणात शमशुद्दीन मोहम्मद खुर्शीद हसीफ (वय 24, व्यवसाय – शेफ) याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्मा आणि शमशुद्दीन यांच्यात काही काळ प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात तणाव आणि वाद निर्माण झाले होते.
घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला आणि संतप्त झालेल्या शमशुद्दीनने धारदार शस्त्र घेऊन करिश्माच्या गळ्यावर वार केला. हा प्रकार तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये घडला. तिच्या रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पोलिसांना सापडला. माहिती मिळताच मीरा रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. यानंतर अवघ्या चार तासांत पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपी शमशुद्दीनला अटक केली. आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही घटनांनी मीरा-भाईंदर परिसरात मोठी खळबळ उडवून दिली असून, प्रेमसंबंध व व्यक्तिगत वादातून होणाऱ्या हिंसाचाराबाबत चिंतेचे वातावरण आहे. मात्र, पोलीस दलाच्या जलद आणि प्रभावी कारवाईने नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरात शांतता प्रस्थापित राहावी यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.