संग्रहित फोटो
प्रभाग क्रमांक 21 मधील विरोधी उमेदवाराच्या घरात भाजप कार्यकर्ते शिरले, असा आरोप केला जात आहे, तसे व्हिडीओ समोर आणून हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. आमच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी काय केली, अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे. आरोपी हे विरोधी पॅनल भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते असल्याचा त्यांचा आरोप आहे. ही घटना काल रात्री 12: 15 च्या सुमारास नवमहाराष्ट्र स्कुल पिंपरी गावातील घराजवळ घडली आहे.
स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरून जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे, इतर काही जणांनी घरासमोर येऊन स्वप्नील वाघेरे याने आमच्या परवानगी शिवाय घरात प्रवेश केला. माझे चुलत सासरे यांना अश्लील शिवीगाळ केली. तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचं धाडस केले. तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी देण्यात आली असे फिर्यादीत म्हटले आहे.
बाळासाहेब सरवदेंची हत्या
गेल्या काही दिवसाखाली सोलापुरात एक धक्कदायक घटना घडली आहे. राजकीय वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली आहे. बाळासाहेब सरवदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होते. त्यांच्या डोळ्यात चटणी घालण्यात आली नंतर त्यांच्यावर चाकूने वार करत हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी मयत बाळासाहेब याचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याच्या फिर्यादीवरून सोलापूरच्या जेलरोड पोलीस ठाण्यात 15 जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. बीएनएस कलम 103, 109, 189 (1),(2), 190, 191(2),(3), 49, 352, 351(2), शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






