गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी राजस्थानमधील एका व्यक्तीसोबत अत्यंत अश्लील पद्धतीने संवाद साधताना व नग्न अवस्थेत बोलताना दिसते. ही क्लिप इतकी धक्कादायक होती की त्याचे पडसाद पोलिस यंत्रणांपर्यंत पोहोचले. आता या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तरुणीला अटक केली असून, चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत.
मित्रानेच केला मित्राचा घात; धारदार शस्त्राने सपासप वार केले अन् नंतर…
अटक करण्यात आलेल्या तरुणीचा नाव स्मृती जैन आहे. प्रदेशातील ललितपूर येथील रहिवासी आहे. तिने उत्तर प्रदेशातील एका नामांकित महाविद्यालयातून बी.टेक पदवी घेतली आहे. विशेष म्हणजे ती एका नोएडातील सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होती आणि तिचं वार्षिक पॅकेज तब्बल २५ लाख रुपये होतं.
नोएडामधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत असताना तिची ओळख बिहारमधील शानू कुमार नावाच्या तरुणाशी झाली. शानू हा वैशाली (बिहार) येथील रहिवासी आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आलिशान जीवनशैली जगण्याच्या हव्यासापोटी त्यांनी अश्लील व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली होती. जैसलमेरमधील एका ज्येष्ठ व्यक्तीसोबत अश्लील व्हिडीओ तयार केल्यानंतर ही तरुणी तसेच तिचा बॉयफ्रेंड यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जैसलमेर पोलिसांनी या दोघांनीही नोएडामधील एका फ्लॅटमधून अटक केली आहे.
व्हिडीओ बनवण्याची सुरवात कुठून केली
अंदाजे तीन वर्षांपूर्वी दोघं थायलंडला ट्रिपसाठी गेले होते. तिथे स्मृतीने काही पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि तिच्या बॉयफ्रेंडने हे सर्व हिडन कॅमेऱ्यात शूट केलं. नंतर या व्हिडीओंना चेहरा ब्लर करून आणि आवाज बदलून ते परदेशी अश्लील वेबसाईट्सवर विकण्यात आले. या व्हिडीओंमधून त्यांना लाखो रुपये मिळाले. आणि त्याच लोभापायी त्यांनी हेच धंदा म्हणून सुरू ठेवले.त्यानंतर त्यांनी नोएडाच्या फ्लॅटमध्ये अश्लील व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. हे व्हिडीओ ते परदेशी संकेतस्थळांना विकू लागले. असाच एक व्हिडिओ त्यांचा चांगलाच पाहिला गेला. त्यानंतर ते दिल्ली, नोएडा अशा भागात जाऊन मोकळ्या मैदानात व्हिडीओ शूट करू लागले.हे व्हिडीओ अपलोड करताना ते तरुणीचा चेहरा ब्लर करायचे. तसेच आवाजही बदलायचे. सोबतच वेगवेगळे डिजिटल फिल्टर वापरून ते हे व्हिडिओ विकायचे.
पोलिस तपासात असंही समोर आलं आहे की, दोघांनी राजस्थानमधील १० पेक्षा जास्त शहरांमध्ये अश्लील व्हिडीओ शूट करण्याचा प्लॅन बनवला होता. पण त्याआधीच त्यांचे बिंग फुटले. दोघांना पोलिसांनी स्मृती जैन आणि शानू कुमार या दोघांना अटक करण्यात आली आहे.
Cyber Crime : सायबर चोरट्यांचा नवा डाव; डिजीटल ॲरेस्टची भिती दाखवली अन्…