आईशी सतत भांडतो म्हणून सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; भंडाऱ्यात एकच खळबळ (फोटो - iStock)
भंडारा : आईशी वारंवार भांडण करणाऱ्या थोरल्या भावाचा धाकट्या भावाने खून केला. या तरुणाने रागाच्या भरात हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील तुमसर शहरात घरगुती वाद घालत होता. त्यामुळे रोशनचा धाकटा भाऊ राकेश प्रकाश वासनिक याने आपल्या मित्र किरण उर्फ लारा मारबते याच्यासोबत मिळून हा अत्यंत गंभीर निर्णय घेतला.
विटांनी मारहाण करून हत्या केली. ही हत्या एका मित्राच्या मदतीने केली गेली असून, सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तपासाची सखोल दिशा घेत या मृत्यूमागील क्रूर सत्य उघडकीस आणले. तुमसर शहरातील आंबाटोली परिसरात राहणारा रोशन प्रकाश वासनिक (वय ३५) हा काही दिवसांपासून मद्यधुंद अवस्थेत सतत आईशी वाद घालत होता. त्यामुळे रोशनचा धाकटा भाऊ राकेश प्रकाश वासनिक याने आपला मित्र किरण उर्फ लारा मारबते याच्यासोबत मिळून हा अत्यंत गंभीर प्रकार केला.
शवविच्छेदन अहवालातून गुन्हा झाला उघडकीस
आरोपी राकेश आणि किरण यांनी रोशनचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेहावर आढळलेल्या गंभीर जखमांमुळे पोलिसांना संशय आला. शवविच्छेदन अहवालात मारहाणीचे स्पष्ट पुरावे समोर आल्यावर तपास अधिकच खोलवर करण्यात आला. पोलिसांनी शंका घेऊन राकेश आणि किरण यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आधी अकस्मात मृत्यू नंतर गुन्हा दाखल
दुसऱ्या एका घटनेत, प्रिती सचिन वखारे (वय ३१, रा. खोपडेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सरकारतर्फे सहाय्यक निरीक्षक समीर कदम (वय ४२) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ मे रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला आहे.