रांजणगावमध्ये इस्माचे अपहरण (फोटो- istockphoto)
शिक्रापूर: रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील एका आयुर्वेदिक औषध विक्रेत्याचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात अाली. आळंदी मार्गे हिंजवडी येथे घेऊन जाऊन हिंजवडी पोलिसांत खोटा जबाब द्यायला भाग पाडल्याची घटना घडली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशनमध्ये खेमसिंग उदलीसिंग चितोडिया, मलखानसिंग चितोडिया, टारनसिंग चितोडिया, सचिनसिंग चितोडिया, दिलीपसिंग चितोडिया, मिलून हेमसिंग चितोडिया, सागरसिंग उदलिसिंग चितोडिया यांसह अनोळखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील आयुर्वेदिक औषध विक्रेते रामसिंग चितोडिया यांनी काही वर्षांपूर्वी हिंजवडीमध्ये जागा घेतली होती. ही जागा त्यांच्या नात्यातील काहीजण कमी किमतीत मागत असल्याने रामसिंग यांनी जागा अन्य व्यक्तीला विक्री केली. ते एक जून रोजी रात्रीच्या सुमारास घरात झोपलेले असताना मलखानसिंग, टारनसिंग, सचिनसिंग, दिलीपसिंग यांसह पाच अनोळखी युवक तीन वाहनातून रामसिंगच्या घरी आले. त्यांनी रामसिंगसह त्याच्या पत्नीला मारहाण केली.
त्यांनतर रामसिंगला एका कारमध्ये बसवून मारहाण करत आळंदी मार्गे हिंजवडीमध्ये नेले. तेथे सर्वांनी मिळून बेदम मारहाण केली. याबाबत रामसिंग इंदरसिंग चितोडिया (वय ४०, रा. शेळके असती, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी खेमसिंग उदली सिंग चितोडिया, मलखान सिंग चितोडिया, टारन सोंह चितोडिया, सचिन सिंग चितोडिया, दिलीप सिंग चितोडिया, मिलून हेमसिंग चितोडिया, सागरसिंग उदलिसिंग चितोडिया यांच्यासह अनोळखी पाच जणाविराेधात (सर्व रा. साखरेवस्ती, हिंजवडी, पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे पुढील तपास करत आहे.
‘या’ गुन्ह्यातील चोरट्यांना पकडण्यात मिळाले यश
शहरात सोन साखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना वाघोली पोलिसांना सोन साखळी चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. दरम्यान, पाच जणांची टोळी असल्याचे समोर आले असून, ते दुचाकी चोरून त्या दुचाकीवर सोन साखळी चोरत असल्याचे समोर आले आहे. तर, यातील एक नाशिक पोलिसांना ३ गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी असल्याचेही समोर आले आहे.
Crime News: पुणे पोलिसांना मोठे यश! ‘या’ गुन्ह्यातील चोरट्यांना पकडण्यात मिळाले यश
प्रशांत संतविजय यादव (वय १९, रा. नाशिक), कुणाल विश्वनाथ साबळे (वय २१), ताजीम सल्ला उद्दीन अन्सारी (वय २०) तसेच संजोग संतोष भांगरे (वय १८) व मनोज उदय पाटील (वय ३१, रा. सर्व नाशिक शहर) यांना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक मनोज बागल व त्यांच्या पथकाने केली आहे.