त्याचा मागोवा घेतल्यानंतर तपासात समजले की सदर पिशव्या या शंकर आत्राम यांच्या मालकीच्या आहेत. तेव्हा तत्काळ छापा टाकून एकूण ३ पोते (अंदाजे ९० किलो) सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आला असून नियमांनुसार ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असून व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा गुन्हा केल्यास १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
माहिती देणाऱ्यास मिळणार ५ हजारांचे बक्षीस
मनपा हद्दीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असून प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्याबाबत गुप्त माहिती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. यास मोठा प्रतिसाद मिळूनमनपापर्यंत प्लास्टिक साठ्याची गुप्त माहिती पोचविण्यात येत आहे. ही कारवाई प्रभारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके, भुपेश गोठे, शुभम खोटे, जगदीश शेंद्रे, शुभम चिंचेकर, राहुल गगपल्लीवार, पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली.
अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; साहित्याच्या बहाण्याने जायचा अन्…
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता चंद्रपुरात एक संतापजनक घटना घडली. एक शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
दिलीप दादाजी मडावी (वय ५३) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलगी राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत पाच वर्षांपूर्वी इयत्ता सहावीत शिकत होती. आरोपी शिक्षक मडावीसुद्धा तिथेच कार्यरत होता. पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला उच्च शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवावे, असा सल्ला त्याने मुलीच्या आई-वडिलांना दिला. त्यानुसार, गेल्या वर्षी पीडिता चंद्रपूरात शिक्षणासाठी आली.
Ans: बिनबा गेट परिसरातील राकेश तोतवानी यांच्या गोदामात ही कारवाई झाली.
Ans: एकूण ९० किलो सिंगल-यूज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
Ans: ५ हजारांचा दंड आकारला गेला असून पुन्हा गुन्हा आढळल्यास १० हजारांचा दंड ठोठावला जाईल.






