चंद्रपूर: चंद्रपूर वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यात आहे. नेमकं प्रकरण काय आहे
Uttarpradesh: पतीचा चकित करणारा निर्णय! पत्नीचे तिच्या प्रियकराशी लावून देणार लग्न एवढेच नाही तर…
प्रकरण काय?
२८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री राकेश जाधव हे गस्तीवर होते. त्यावेळी राकेश जाधव यांनी चिमूर येथील हजारे पेट्रोलपंपासमोर वाळू भरलेला एक हायवा पकडला आणि चिमूर पोलीस ठाण्यात तो हायवा पार्क करण्यात आला. मात्र या ट्रकची फिर्याद, जप्ती पंचनामा किंवा स्टेशन डायरीत नोंदच करण्यात आली नाही. त्यामुळे तब्बल दहा दिवस हा हायवा पोलीस ठाण्यात बेवारस अवस्थेत उभा राहिला.
दरम्यान, या हायवामधील वाळू चोरीची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यामार्फत चौकशी सुरू केली आणि आता हा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मते याबाबतचा अहवाल ते लवकरच नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना पाठवला जाणार आहे.
बार्शी हादरली! 14 महिन्याच्या लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास
सोलापूर जिल्ह्यातीतील बार्शीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाणी प्लॉट परिसरात २५ वर्षीय विवाहितेने आपल्या चिमुकल्या १४ महिन्यांच्या बाळाला आधी विष पाजले. त्यानंतर स्वत: घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले असून, त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. मृत महिलेचे नाव अंकिता वैभव उकिरडे (वय २५) असे आहे. तर तिच्या मुलाचे नाव अन्विक वैभव उकिरडे (वय १४ महिने) असे आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली आहे.
अंकिताचे चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्यासोबत लग्न झाले होते. घटनेच्या दिवशी घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता ही मुलासह घरात एकटीच होती. नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या महिलेने घरात कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून पाहिले असता, अंकिताने गळफास घेतलेले धक्कादायक दृश्य तिला दिसले. तर, लहान अन्विक बाजूला अत्यवस्थ अवस्थेत पडलेला होता. महिलेने आरडाओरडा करून नातेवाईक व शेजाऱ्यांना बोलावले.
अन्विकला तातडीने बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर सध्या त्याला पुढील उपचारांसाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. त्याची स्थिती गंभीर असून उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Ans: चंद्रपूर
Ans: राकेश जाधव
Ans: कातकडे






