जैन-खानजादा हत्याकांड विचित्र दिशेला; आरोपीने सांगितला गुन्ह्याचा घटनाक्रम (फोटो सौजन्य - istockphoto)
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता अमरावती शहरातील वडाळी परिसरात असलेल्या मध्यवर्ती कारागृहातच कैद्यांमध्ये आपसात हाणामारी झाली. या हाणामारीत कारागृहातील साहित्याची तोडफोडही करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
कारागृहात झालेल्या या राड्यानंतर पोलिस हवालदार प्रमोद महाजन (वय 53) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आनंदा विकास डायलकर, रोहित गजानन मरसकोल्हे, करण मोहन पंजाबी, अक्षय मोहन उईके, ऋतिक अनिल श्रीवास, शुभम बंडफ धाकडे, दीपक उर्फ झाशी शंकर कुंभेकर यांच्यासह 17 कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या कैद्यांमध्ये पाण्यावरून भांडण झाल्याची माहिती आहे.
एका बराकमध्ये सुमारे 35 ते 40 कैदी होते. कैद्यांनी एकमेकांचे कपडे फाडले आणि तेथे असलेली भांडी हत्यार म्हणून वापरली आणि एकमेकांवर हल्ला केला. या हाणामारीत 3 कैदी जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने इर्विन रुग्णालयात आणण्यात आले. जखमी कैद्यांमध्ये विनोद प्रकाश कांबळे, दीपक उर्फ झांशी शंकर कुंभेकर व मोहन गजानन लोणारे यांचा समावेश आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पुण्यातही हाणामारीची घटना
पुण्यातील एका घटनेत, वाद-विवादातून एका अल्पवयीन मुलावर ११ जणांच्या टोळक्याने शस्त्राने वार करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. खडकी बाजार परिसरात हा प्रकार घडला असून, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी खडकी पोलिसांनी अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. टोळक्याच्या हल्यात लक्ष्य कैलास गोयर (वय १७, रा. खडकी बाजार) हा मुलगा जखमी झाला आहे. याबाबत लक्ष्यने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.