एका दाम्पत्याने पैश्यांसाठी मर्यादा ओलांडल्या. त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावून अश्लील कृत्य करत त्यांचं लाईव्ह स्ट्रीमींग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हैद्राबादच्या अंबरपेठ परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत कॅमेरासह इतर साहित्य जप्त केलं आहे. तसेच पती पत्नीविरोधातच गुन्हा दाखल करत त्यांना अटकही करण्यात आली आहे.
२५ वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या; काही तासांतच आरोपीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नी हैद्राबादच्या अंबारपेट परिसरातील मल्लिकार्जुन नगर येथील रहिवासी आहे. आरोपीचं हा ४१ वर्षाचं असून तो टॅक्सी ड्रायव्हर आहे. तर त्याच्या पत्नीचं वय ३७ वर्ष आहे. दोघांनी जास्त पैसे कमावण्याच्या नादात हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
पती पत्नी दोघेही अश्लील कृत्य करत त्यांचे रेकॉर्डिंग करत होते. तसेच एका अपवर त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येत होतं. त्यासाठी त्यांनी एका युजर्सकडून २००० रुपये मिळत होते. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. याची गुप्त माहिती हैद्राबाद पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी आरोपीच्या ठिकाणावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना काही रेकॉर्ड केलेले व्हिडीओ आढळून आले.
व्हिडीओत ओळख लपविण्यासाठी ते मास्क लावून व्हिडीओ रेकॉर्ड करत असे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. त्यांच्या घरातुन हाय डेफिनिशन कॅमेरा आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
धक्कादायक ! भरदिवसा पत्नीसमोरच केले पतीचे अपहरण; यवतमाळच्या उमरखेड येथील घटना
उमरखेड : तालुक्यातील मानकेश्वर येथील पती-पत्नी दुचाकीवर उमरखेडकडे दवाखान्यात येत असताना हरदडा फाट्याजवळ 7 जणांनी दोघांनाही मारहाण केली. या दुचाकीवर बसवून पतीचे अपहरण केले. ही घटना शुक्रवारी (दि.27) सकाळी अकराच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेला 24 तास उलटूनही केवळ एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.
याप्रकरणी पल्लवी विकास पतंगे यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दिली. त्यावरून परमेश्वर माने, सुशील माने, अक्षय माने, गजानन माने, शिवाजी माने, संदीप माने, स्वप्नील माने (सर्वजण रा. चातारी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विकास पतंगे (वय 22, रा. मानकेश्वर, ता. उमरखेड) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
२५ वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या; काही तासांतच आरोपीला अटक