मालेगावच्या सुजन टाकी परिसरात एका २५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला काही तासातच अटक केली आहे. मृतकाचे नाव अमोल मोहन निकम (वय २५, रा. एकतानगर, गवळीवाडा) असे आहे. या संदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक तेगबिरसिंह संधू व सहाय्यक पोलिस अधिक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशाल मारुती गवळी (वय ३८, रा. कैलास नगर, कॅम्प) याला ताब्यात घेतले.
मारुतीची कसून चौकशी केली असता त्याने मागील घडलेल्या वादाचा राग मनात ठेवून अमोल निकमची गळा आवळून हत्या केल्याचे तपासात उघडकीस आल्याचे पोलिसांना सांगितले. यात काही तासातच विशालला अटक केली आहे. पोलिसांच्या पथकाने सांगितले खुनाचा छडा लावला. विशाल गवळीला छावणी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरील खुनाचा तपास पोलीस निरीक्षक दीपक जाधव करीत आहे.
नाशिक हादरलं! डोक्यात कोयत्याने वार करून एकाची हत्या
नाशिकमध्ये सतत गुन्हेगारी घटना घडत आहे. नाशिकच्या अंबड परिसरात एका २६ वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतकाचे नाव प्रशांत भदाणे असे आहे.