आरोपी निलेश चव्हाणला 14 दिवसांची कोठडी (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणात आज एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून अटक केली होती. दरम्यान त्याची आज कोठडी संपल्यावर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपिला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण आरोपी आहे. आज कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे निलेश चव्हाण जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. वैष्णवी हगवणेने सासरच्या जाचाला कंटाळून स्वतःचे जीवन संपवले होते.
याआधी कोर्टाने निलेश चव्हाणला 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्याची कोठडी संपणार होती. त्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यावर कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.