डॉक्टकडून महिलेचा विनयभंग (फोटो- istockphoto/टीम नवराष्ट्र)
शिक्रापूर : शिक्रापूरमधील शिरुर येथील एक महिला न्हावरा येथे उपचारासाठी दाखल असताना हॉस्पिटल मधील डॉक्टरने रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. द्रमयाब सदर डॉक्टरला न्यायालयाने दोन वर्षे कारावास आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून डॉ. रामहरी भुजंगराव लाड असे शिक्षा सुनावलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील महिला ऑगस्ट २०२० मध्ये न्हावरा येथील डॉ. रामहरी लाड यांच्या नाथकृपा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना रात्रीच्या वेळी डॉ. रामहरी लाड यांनी महिलेला तपासणी करण्यासाठी केबिनमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर महिलेला गुप्तांगातून तपासणी करायची सांगत महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत महिलेचा विनयभंग केला. दरम्यान महिलेने डॉक्टरला ढकलून देत बाहेर आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी न्हावरा येथील नाथकृपा हॉस्पिटल चे संचालक डॉ. रामहरी भुजंगराव लाड वय ४६ वर्षे रा. न्हावरा ता. शिरूर जि. पुणे यांच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे यांनी आरोपीबाबत योग्य पुरावे व साक्षीदार न्यायलयात हजर केले असता अखेर जिल्हा सत्र न्यायालय जे. ए. झारी यांनी आरोपी डॉ. रामहरी लाड यास दोन वर्षे कारावास आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, तर गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून माया क्षिरसागर – जाधव यांनी काम पाहिले तर महिला पोलीस अंमलदार एम एस फंड, पी. एस. वाघमारे, पी. एस. वाडेकर तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष कामगिरी बजावली. तर शिरुर तालुक्यातील बड्या डॉक्टरला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली आहे.
डिंग्रजवाडीत शेतात शौचास जाणाऱ्या महिलेला मारहाण
डिंग्रजवाडी (ता.शिरुर) येथील एका शेतात शौचास जाणाऱ्या उसतोड कामगार महिलेला पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संदीप पोपट गव्हाणे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील संदीप गव्हाणे यांच्या घराच्या शेजारी दहा दिवसांपासून काही उसतोड कामगार राहत असून, सकाळच्या सुमारास उषाबाई गायकवाड या गव्हाणे यांच्या शेताकडे शौचास जात असताना संदीप गव्हाणे या इसमाने शेताकडे येत ‘तुम्ही शेतात शौचास का येता? तुमच्याकडे बघतोच…’ असे म्हणून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली
डिंग्रजवाडीत शेतात शौचास जाणाऱ्या महिलेला मारहाण; दमदाटी करत पाईपनेही मारलं
दरम्यान, महिलेले आरडाओरडा केल्याने शेजारील वयोवृध्द महिला तिला सोडवण्यासाठी आली असता संदीप याने तिला देखील मारहाण केली. याबाबत उषाबाई ज्ञानेश्वर गायकवाड (वय ४० वर्षे सध्या रा. डिंग्रजवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संदीप पोपट गव्हाणे (रा. डिंग्रजवाडी ता. शिरुर जि. पुणे) या इसमावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे हे करत आहे.