पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केली तरुणाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन्... (संग्रहित फोटो)
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे सोमवारी रात्री महादेवी हत्तीणीला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने अचानक हिंसक वळण घेतले. मिरवणुकीदरम्यान काही संतप्त जमावाने भर चौकात अचानक दगडफेक सुरू केली, परिणामी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या आठ ते नऊ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करून जमावाला पांगविण्यात आले.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके, शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, राखीव पोलिस दल व मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी ठिय्या मारून होता. वनतारा येथून आलेल्या अधिकृत पथकाच्या ताब्यात मध्यरात्री एक वाजता महादेवी हत्तीणीला देण्यात आले. मात्र या पथकाच्या वाहनांवरही जमावाकडून दगडफेक करण्यात आली. उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या गाडीवरही दगडफेक केली असून काही पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले आहेत.
जयसिंगपूर रोडवरील निशिधी समोर मोठ्या प्रमाणावर दगडांचा खच पडलेला दिसून आला. शांतता राखण्याचे आवाहन मठ प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात आले होते, परंतु जमावाकडून सुरू असलेल्या दगडफेकीमुळे परिस्थिती बिघडली. या प्रकारामुळे गावात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून, शासकीय गाड्यांचे नुकसान करणाऱ्या विरोधात कडक कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
रोष सरकारवर ?
महादेवी हत्तीणीला नांदणीतून गुजरातला पाठवू नये यासाठी न्यायालयीन लढा सुरू होता. उच्च न्यायालयाने महादेवीचा ताबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंचक्रोशीसह समस्त जैन समाजाने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले मात्र सर्वोच्च न्यायालयाने महादेवीची याचिका फेटाळून उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला यामध्ये सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे होते मात्र केले नसल्याने समस्त जैन समाजाने सरकारला या प्रकरणी दोषी धरले आहे.
मागील 33 वर्षांपासून मठात सांभाळ
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनताराकडे जाणार आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थ मात्र नाराज झालेत. कोल्हापुरातील नांदणी इथला मठ जैन धर्मियांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातो. या मठात मागील 33 वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीणीचा सांभाळ करण्यात आलाय. मात्र याच हत्तीणीला गुजरातच्या वनतारा अभय़ारण्यात नेण्यात येणार आहे. हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्याचे हायकोर्टानं दिल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं, मात्र तिथही त्यांना निराशा मिळालीय.