आजकाल सायबर चोर कशा पद्धतीने नागरिकांना गंडा घालतील याचा नेम नाही. अशीच काहीशी घटना ही गोंदियामध्ये घडल्याचं पाहायला मिळाल. सायबर चोरट्यांनी आरटी ओ ई-चालानच्या माध्यमातून ५ लाखाला गंडा घातला आहे. आरटीओ च आलेल ई-चालान क्लिक केल असता खात्यातून ५ लाख रुपये कट झाले. पैशाचे व्यवहार करताना अधिकृत वेबसाईटवरूनच करा अस आवाहन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केल आहे.
बड्या अधिकाऱ्याकडून महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी; केबिनमध्ये बोलावलं अन्…
कशी घडली घटना ?
गोंदिया शहरातील सराफा लाईन मधील विवेक अग्रवाल यांच्यासोबत हा फ्रॉड झाला आहे. त्यांना त्यांच्या मोबाईलवर आरटीओ ई-चालान एपीके नावाने एक लिंक आली आणि त्यांचं अकाउंट हॅक झालं. बँकेत जाऊन चौकशी केली असता ओडिशातील आशुतोष नायक नावाच्या व्यक्तीने चेकवर पैसे विड्रा केल्याचं समजलं.
या घटनेनंतर अग्रवाल यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पैसे अकाउंट मधून उडाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरल आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आयपीसी कलम ३१८ ( ४ ) माहिती व तंत्रज्ञान कायदा ६६ डी अंतर्गत नोंद केला आहे. असे व्यवहार करताना अधिकृत वेबसाईटवरूनच करा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आल आहे.
मजुरीचे पैसे मागितले म्हणून ठेकेदारानेच केली मजुराची निर्घृणपणे हत्या
गोंदियाच्या रायपूर गाव शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ठेकेदाराला मजुरीचे पैसे मागितले म्हणून हत्या करण्यात करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. या परकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि दावनिवाडा पोलिसांनी केला आहे. कापूरचंद उर्फ बंटी हरिचंद ठाकरे (39) व ओमकार चेतराम नेवारे (52) दोन्ही रा. रायपूर जि. गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
मृतकाचे नाव हसनलाल पाचे असे आहे. हसनलाल आरोपी कपूरचंद ठाकरेकडे बांधकामावर मजुरीचे काम करीत होता. घटनेच्या दिवशी मृतक आणि आरोपी ठाकरे यांच्या मजुरीच्या पैशावरून वाद झाला. यामुळे ठाकरे याने हसनलाल याला बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात दवनीवाडा पोलीस स्टेशनचच्या पोलीस निरीक्षक वैशाली ढाले करीत आहेत.