 
        
        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मीडिया)
Devendra Fadnavis: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषींपैकी कोणालाही सोडले जाणार नाही,असे आश्वासन दिले आहे. तसेच आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे.
डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महिला आयपीस अधिकारींच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
बदनेच्या चौकशीसाठी गोरेंच्या जवळच्या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषींपैकी कोणालाही सोडले जाणार नाही,असे आश्वासन दिले आहे. या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या जवळच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार मेहबूब शेख यांनी केला आहे.
Local Body Elections: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; स्थानिक निवडणुकांसाठी खर्च मर्यादेत मोठी वाढ
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार मेहबूब शेख यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. मृत डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये मुख्य आरोपीने तिच्यावर चार वेळी बलात्कार केल्याचे लिहून ठेवले आहे. त्याची पोलिस खात्यांतर्गत चौकशी होण्यासाठी पोलिस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सनावणे आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी साडेचार तास गोपाल बदनेची चौकशी केल्याची माहिती आहे. पण हे घनश्याम सोनावणे हे भाजप नेते जयकुमार गोरे यांचे जवळचे सहकारी आहेत, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे.
गोपाळ बदने यांच्या चौकशीसाठी घनश्याम सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती ‘सापळा’ असल्याचा आरोप मेहबुब शेख यांनी केला आहे. “देवाभाऊ, तुम्हाला दुसरा अधिकारी मिळाला नाही का? जयकुमार गोऱ्हे यांना भेटलेला आणि त्यांच्याशी निष्ठा दाखवणारा हाच अधिकारी या चौकशीसाठी का नेमला?” असा सवाल शेख यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे म्हटले की, “हा अधिकारी स्वतः म्हणतो — ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’. मग अशा अधिकाऱ्याला गोपाळ बदने यांच्या चौकशीसाठी नेमण्यामागे कोणते हितसंबंध आहेत?” असे सवालही शेख यांनी उपस्थित केले.






