भंडारा जिल्ह्यात १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार (फोटो- istockphto)
भंडारा: राज्यभरात गेल्या काही काळामध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आशा दुर्दैवी घटना घडत असतानाच भंडारा जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. भंडारा जिल्ह्यात एका १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरात झोपलेल्या मुलीवर सावत्र बापानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात नात्याला काळिमा फसणारी ही घटना घडली आहे. सावत्र बापानेच घरात झोपलेल्या १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने आरोपी बापाविरुद्धह फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली आहे. ही घटना पवनी तालुक्यातील अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षकाने विद्यार्थिनीला घरी बोलावलं; फोटोही मागितले अन् नंतर…
बोराळे येथील एका माध्यमिक प्रशालेतील शिक्षकाने 17 वर्षीय विद्यार्थिनीस ‘तू माझ्या घरी ये, मी दहावीच्या पेपरला मदत करतो. त्यामुळे तुला जास्त मार्क पडतील व तुझा बोर्डात नंबर येईल’, असे म्हणून शारिरिक संबंधाची मागणी केली. नंतर घराचा दरवाजा बंद करून जवळ ओढून लगट केली. याप्रकरणी येथील माध्यमिक शिक्षक रमेश नागनाथ पाटील याच्याविरूध्द पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, हा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला.
पीडित मुलगी ही 17 वर्षांची असून, ती पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण घेत असताना सदर आरोपी हा हिंदी व मराठी विषय शिकवायला येत होता. तासाच्या वेळी आरोपी हा सदर अल्पवयीन मुलीच्या जवळ येऊन अंगाला हाताने स्पर्श करून बोलत असायचा. मात्र, यावेळी पीडिता ही लहान असल्यामुळे तिला काही समजत नसल्याने ती घरात कोणाला काही बोलली नाही. त्यानंतर सातवी व आठवी वर्गावर आरोपी शिक्षकाचा कोणताही तास नसताना अल्पवयीन मुलीस सातत्याने जवळीक साधून बोलण्याचा प्रयत्न करत असे. आरोपीने अल्पवयीन मुलीस ‘तू माइया घरी ये, आमच्या घरी कोण नसते. आपणास खुले बोलता येईल’, असे म्हणून व्हॉटसअॅपव्दारे वारंवार मेसेज केला.
धक्कादायक ! शिक्षकाने विद्यार्थिनीला घरी बोलावलं; फोटोही मागितले अन् नंतर…
तसेच फोटो पाठविण्यासही सांगितले. त्यावेळी मुलीने ‘आमचा ग्रुप फोटो आहे. माझा वैयक्तिक फोटो नाही, असे सांगितले. घरी आल्यास मी दहावीच्या पेपरला मदत करतो. त्यामुळे तुला जास्तीचे मार्क पडतील. तुझा बोर्डात नंबर येईल व तुझे नाव होईल, असे म्हणून आरोपी शिक्षकाने मुलीकडे दोन वेळा शारिरिक संबंधाची मागणीही केली होती. 17 मार्च 2025 रोजी शेवटचा भूगोलचा पेपर दोन वाजता संपला. त्यावेळी आरोपी शिक्षकाने फोन करून पेपर कसा गेला? असे विचारून ‘आमच्या घरी तू कधी येते?’, असे विचारले.