सिन्नरमध्ये ४० लाखांची फसवणूक! (Photo Credit- X)
या पाच जणांविरोधात गुन्हे दाखल
गौरव सोमवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, नाशिक कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे महेंद्र अशोक शिंगारे (रा. अंबड, नाशिक), शेखर कचरू जाधव (रा. घाटकोपर, मुंबई), जितेश सुधाकर रूपवते (रा. पिंपळे, ता. सिन्नर) या तिर्धासह कर्ज देणाऱ्या समुन्नती फायनान्शिअल इंटरमीडिएशन अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड तसेच किसानधन सक्टिस प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही बँकेतील कर्ज मंजूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजीनाम्यानंतर संचालकांचे धनादेश कंपनीतच
फिर्यादी गौरव सोमवेशी आणि आदित्य कुलकर्णी यांनी हिवरे, ता. सिन्नर येथील नाशिक कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक पदाचा १ जानेवारी २०२४ रोजी राजीनामा दिला होता. मात्र, राजीनामा देताना दोघांचेही धनादेश नजरचुकीने कंपनीतच राहिले होते. या धनादेशाचा गॅरंटर म्हणून वापर करून महेंद्र शिंगारे यांच्यासह इतरांनी २५ मार्च २०२४ रोजी समुन्नती फायनान्शिअल इंटरमीडिएशन अँड सर्विस प्रा. लि. या बँकेतून २५ लाखांचे कर्ज घेतले. याशिवाय किसानधन अॅग्रो फायनान्शिअल प्रा. लि. या कंपनीतून ६ फेब्रुवारी २०२४ रोजी १५ लाखांचे कर्ज फिर्यादी, साक्षीदार आणि इतर संचालकांच्या नावावर घेतले. दोन्ही कर्ज रक्कम मिळून सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक केली.
माजी संचालकांच्या अनुपस्थितीत धनादेशाचा गैरवापर
विशेष महणजे, फिर्यादी गौरव सोमवंशी आणि साक्षीदार आदित्य कुलकर्णी हे प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही स्यांच्या नावे बनावट लोन असेग्रीमेट तयार करून खोटाचा सह्या मारत है ४० लाख रुपयांचे कर्ज काढले, या प्रकरणी गौरव सोमवंशी यांनी दिलेल्या कियांदीवरून सिन्नर पोलिसात ठकबाजीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे करत आहेत.






