रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात ३१ जुलैला हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकटे असलेल्या ७२ वर्षीय वृद्धाचा गळा चिरून डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना संध्याकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार अनोळखी व्यक्तीने केला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांनी तपास केला असून आरोपीची ओळख पटली असून मारेकरी दुसरा तिसरा कोणी नाही तर मृत वृद्ध व्यक्तीचाच नातू निघाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपीचं नाव मोहमद असगर अली परदेशी (१८ वर्षीय) असं आहे. तर मृतकाचे नाव आजोबा शौकत अली हुसेनमियाँ परदेशी (वय 72 वर्ष) असे आहे. आधी नातवाने आपल्या आजोबाची हत्या केली त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्लॅन आखला. त्याने पोलिसांना सांगितले की आजोबांची हत्या झाली. एक जण त्यांना मारुन घरातून पळून गेल्याचा बनाव त्याने उभा केला. त्याने आपल्या डोक्यावर मारेकऱ्याने कापड टाकल्याचंही सांगितलं, पण पोलिसांनी शेजाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीनुसार आणि त्याच्या हातावर झालेल्या जखमांची चौकशी केली. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने कबुली दिली.
कशी केली हत्या?
आजोबा गाढ झोपेत होते. तेव्हा तो लोखंडी रॉड आणि घरातील धारदार सूरी घेऊन आजोबांच्या खोलीत गेला. नातवाने आजोबाच्या डोक्यावर लोलखंडी रोडने जोरदार वार केला. त्यानंतर सुरीने गळ्यावर वार केले, तसेच दोन्ही हातांचे मनगटाच्या नसा कापून त्यांना संपवलं.
का केली हत्या?
‘तुम कितना भी पढ लो, तेरा कुछ नही हो सकता’, ‘तुम ऐसेंही रहोगे’, असे टोमणे आजोबा सतत नातवाला मारत होते. त्यामुळे रागाच्या भरात आजोबांचा खून केल्याची माहिती आहे.
आरोपीला अटक
म्हसळा पोलिसांनी केवळ तीन तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. म्हसळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी नातू मोहमद असगर अली परदेशी याला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
भोसरी एमआयडीसीतील दुकान फोडलं; 40 लाखांचे साहित्य चोरीला, पोलिसांना माहिती मिळताच…