'तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही डायरेक्ट छातीवर मारतो' असे स्टेट्स ठेवणाऱ्या तरूणाची भरदिवसा हत्या; गावठी कट्ट्याने केले 12 राउंड (संग्रहित फोटो)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नागपुरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना सोमवारी रात्री जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत घडली.
स्वप्निल गोसावी (वय 30, रा. हुडको कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री स्वप्निल जेवण करण्यासाठी नारा रोडवरील सावजी भोजनालयात गेला होता. या दरम्यान त्याचा तेथे काही तरुणांशी वाद झाला. भोजनालयात उपस्थित इतर लोकांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद सोडवला. त्यानंतर स्वप्निल दुचाकीने घराकडे निघाला. त्याच्या मागेच आरोपीही तेथून निघाले. नारा रोडवर आरोपींनी स्वप्निलला गाठले. जबर मारहाण केल्यानंतर रस्त्यावर पडलेला मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला.
दरम्यान, स्वप्निलला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्वप्निलला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनेचा तपास करत होते.
हत्येचे नेमकं कारण अस्पष्ट
स्वप्निलची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, स्वप्नीलचं काही तरुणांसोबत भांडणं झालं होतं. यानंतर त्यांनी स्वप्नीलला दगडाने मारून गंभीर जखमी केलं. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून आता याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
Pune Crime : प्रेयसीला प्रेमात पाडणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या, प्रियकर पुण्यात आला अन्… , नेमकं प्रकरण काय?
प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन मुलाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, पुण्याच्या देहूरोड येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना समोर येत आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. हत्या झालेल्या मुलाचा चुलत भाऊ देखील या घटनेमध्ये गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव दिलीप मौर्या (वय 16, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे आहे. तर सनी सिंग (वय- 19, रा. गंभीरपूर, जि. गोपालगंज, बिहार) असे आरोपीचे नाव आहे.