एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार (File Photo : Crime)
लातूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचाही समावेश आहे. असे असताना लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. लातूरच्या औसा तालुक्यातील एका नामांकित एचआयव्ही बाधित संस्थेमध्ये हा प्रकार घडला.
लातूरच्या औसा तालुक्यात एक नामवंत एचआयव्ही बाधित संगोपन संस्था आहे. याठिकाणी रुग्णांची सुश्रुषा केली जाते. या ठिकाणीच असा गंभीर प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेतील आणखी काही मुलींवर अत्याचार झाला असल्याची तक्रार मुलींनी केली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार; नराधमाने बालिकेला घरी नेलं…
दरम्यान, बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोकी पोलिसातील गुन्हा औसा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. यानंतर याप्रकरणातील सविस्तर माहिती समोर येऊ शकणार आहे.
अत्याचारानंतर पीडिता गर्भवती
एचआयव्ही बाधित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याने ती गर्भवतीही राहिली होती. मात्र, तिचा गर्भपात करण्यात आला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
कराडमध्ये साडेचार वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कराडमध्ये एका साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कराड तालुक्यात ही घटना घडली. पीडित चिमुकलीची आई स्वयंपाक बनवत असल्याने चिमुकली खेळण्यासाठी घराबाहेर आली. घराबाहेर आलेल्या चिमुरडीवर युवकाने अत्याचार केल्याच्या संतापजनक प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Nashik News : हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले आणि परतत असतांना वाटेत भीषण अपघात; दोन मित्रांचा जागीच मृत्यू