बीड: बीड जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. परळी- बीड राष्ट्रीय महामार्गावर हायवा ट्रक आणि दुचाकींचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेत सरपंच आणि त्याच्या नातीचा मृत्यू झाला आहे. तर सरपंचाच्या पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ते आपल्या नातीला दवाखान्यात दाखवायला परळी गेले होते. तेथून परळीकडून गावाकडे जात असताना ही दुर्घटना घडली.
Nagpur Crime : नागपूर हादरलं! भररस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार; हल्लेखोरांनी ५० लाख लुटले
अपघातात मृतक सरपंचाचे नाव वसंत चव्हाण आणि नातीच नाव श्रुती चव्हाण असे आहे. तर जखमी पत्नीचा नाव कस्तुराबाई चव्हाण असे आहे. हा अपघात पांगरी गावाजवळ घडली. अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यानंतर, स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले असून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. अपघातील हायवा ट्रक महामार्गावरच थांबलेला होता. या घटनेत नातीसह आजोबाचा मृत्यू झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील हायवा हा यश कन्स्ट्रक्शनचा असल्याची माहिती समोर येत आहे.
लग्नाच्या दोन महिन्यात नवविवाहितेने संपवलं आयुष्य
दरम्यान, बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. सासरचे मंडळी हुंड्यासाठी त्रास देत होते. या त्रासामुळे तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आला आहे. लग्नाला केवळ २ महिनेच झाले होते. दोन महिन्यापूर्वी विवाह झाला होता. अवघ्या एक महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपयांची मागणी करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर मला तू आवडत नाहीस, तुझ्यासोबत राहायचं नाही असं तिचा नवरा तिला म्हणत त्रास देत होता. या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव सोनाली बाळू वनवे (वय २२) असे आहे.
रक्कम दिल्यानंतर देखील त्रास
सोनालीचा दोन महिन्यांपूर्वी जंबुरा वस्ती येथील अनिकेत गर्जेशी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपयांची मागणी सुरू केली. सोनालीच्या माहेरकडून ही रक्कम दिल्यानंतरही “मला तू आवडत नाहीस, तुझ्यासोबत राहायचं नाही” असे कारण देत तिच्यावर अत्याचार सुरूच राहिले. सततचा छळ सहन होत नसल्याने सोनालीने आपली व्यथा आईला सांगितली होती, मात्र यात काहीही फरक पडला नाही.
सोलापुरात पुन्हा हिंसाचार! ‘एकच बैठक’ लावण्यावरून वाद आणि थेट कला केंद्राबाहेर गोळीबार