धक्कादायक ! भरदिवसा पत्नीसमोरच केले पतीचे अपहरण; यवतमाळच्या उमरखेड येथील घटना (संग्रहित फोटो)
उमरखेड : तालुक्यातील मानकेश्वर येथील पती-पत्नी दुचाकीवर उमरखेडकडे दवाखान्यात येत असताना हरदडा फाट्याजवळ 7 जणांनी दोघांनाही मारहाण केली. या दुचाकीवर बसवून पतीचे अपहरण केले. ही घटना शुक्रवारी (दि.27) सकाळी अकराच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेला 24 तास उलटूनही केवळ एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.
याप्रकरणी पल्लवी विकास पतंगे यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दिली. त्यावरून परमेश्वर माने, सुशील माने, अक्षय माने, गजानन माने, शिवाजी माने, संदीप माने, स्वप्नील माने (सर्वजण रा. चातारी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विकास पतंगे (वय 22, रा. मानकेश्वर, ता. उमरखेड) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मानकेश्वरवरून उमरखेडकडे मोटरसायकलवर येणाऱ्या विकास पतंगे व त्यांच्या पत्नीला समोरून येणाऱ्या 7 आरोपींनी महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये वाद घातला होता. त्यावेळी विकासने आरोपी विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार का दिली? या जुन्या वादावरून हरदडा फाटा येथे अडवून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. एवढ्यावरच आरोपी न थांबता विकासला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. तसेच आरोपींनी जात असताना तुझ्या पतीला जीवाने मारतो, अशी धमकी देत अपहरण केल्याची तक्रार अपहृताची पत्नी पल्लवी हिने पोलिस ठाण्यात दिली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी विरोधात खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे गुन्हे नोंदविले. या 7 आरोपीपैकी संदीप माने (वय 28) यास अटक केली, तर उर्वरित आरोपींचा शोध युद्धस्तरावर घेतला जात आहे.