संग्रहित फोटो
पुणे : राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दररोज अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालक तरुणावर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शिकवणी चालक तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण खासगी शिकवणी घेतो. पीडित मुलगी त्याच्याकडे शिकवणीसाठी जायची. आरोपी तिला अश्लील चित्रफीत दाखवायचा. तू जर अभ्यास करताना चुकली तर तुला शिक्षा देईल, असे सांगून तिच्याशी अश्लील कृत्य करायचा. घाबरलेल्या मुलीने याची माहिती आईला नुकतीच दिली. नंतर आईने पोलिसांकडे तक्रार दिली. गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे वय २५ वर्ष असून, त्याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे तपास करत आहेत.
कोंढवा भागातील एका शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. कर्वेनगर भागातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांशी नृत्यशिक्षकाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी नृत्यशिक्षकासह संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली होती. शहरात अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : नशेसाठीच्या औषधाची विक्री करणाऱ्या महिलेला अटक; तब्बल 160 बाटल्या जप्त
राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.