जाड्या म्हणून हिणवलं, तरुणाने २० KM पर्यंत केला थरारक पाठलाग, दोघांवर झाडल्या गोळ्या
कर्जत : कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दी मधील बिरदोले गावात ३० एप्रिलच्या रात्री अपघातग्रस्त जखमी तरुणाचे चौकशी वरून वाद निर्माण झाला. त्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले आणि त्यात तेथे भांडण सोडण्यासाठी आलेले महिलेची छेड काढण्यात आल्याची घटना घडली. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
३० एप्रिल रोजी बिरदोले गावात रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास गावातील तरुण निखिल परशुराम कालेकर याचा अपघात झाल्याने त्याचे काका सतीश कालेकर हे रुग्णालयात घेवून गेले होते. गावातील निखील कालेकर यांचा अपघात झाला होता त्याला हॉस्पीटल मध्ये फिर्यादी यांचे दिर सतीश कालेकर हे घेवून गेले होते. अपघात घडला त्यावेळी कालेकर आणि मानिवली गावातील तरुण यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यांनतर मानीवली, बिरदोले आणि देवपाडा येथील सात तरुण हे निखिल परशुराम कालेकर याचे घरासमोर जमले. त्यावेळी अंजना परशुराम कालेकर या त्यांच्या अंगणात उभ्या होत्या. त्यावेळी ते सात तरुण आले आणि त्यांनी अंजना परशुराम कालेकर तसेच साक्षीदार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जोरजोराने सुरू असलेला आवाज ऐकून परशुराम वाळकु कालेकर, प्रेम परशुराम कालेकर आणि अंजना परशुराम कालेकर हे एकत्र आल्यावर त्यांना तेथील प्लास्टिक खुर्ची तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.
या माराहणीत ते तिघे जखमी झाले असून देवपाडा गावातील एका तरुणाने तेथे महिलेच्या छातीवर हात फिरवून त्यांची साडीमध्ये हात घालून साडी सोडण्याचा प्रयत्न केला आणि स्त्री मनात लज्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सतीश कुठे भेटेल तेथे मुर्दा पाडू अशी धमकी दिल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल झाली. याबाबत नेरळ पोलिसांनी फिर्यादी यांच्या सांगण्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल केला. मानिवली येथील तीन,देवपाडा आणि बिरदोले तसेच अन्य अनोळखी तीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सर्व सात जणांवर भारतीय दंड संहिता २०२३चे कलम १८९(२),१९१(२), १९१(३),१९०,७४,११८(१),११५(२),३५२,३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल असून तीन आरोपी तरुणांना नेरळ पोलिसांनी अटक केली आहे.
अपघात ग्रस्त वाहने आजही नेरळ कळंब रस्त्यावर पडून असून जखमी तरुण निखिल परशुराम कालेकर यांच्यावर उपचार सुरू असून या अपघाताची नोंद नेरळ पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला असून अपघात झाल्यानंतर दुचाकी चालकावर चारचाकी वाहन मधील लोक दादागिरी करीत असल्याचे दिसून येत आहे.