कोकण रेल्वेत दागिने चोरट्यांचा धुमाकूळ (फोटो- सोशल मीडिया)
सात महिन्यांत १४ दागिने केले लंपास
यंत्रणांसमोर उभे ठाकले मोठे आव्हान
कोकण रेल्वेत दागिने चोरट्यांचा धुमाकूळ
खेड: कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या (Kokan Railway)रेल्वेगाड्या सध्या मंगळसूत्र चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याचे चित्र दिसून येत आहे. गर्दीचा व महिलांच्या झोपेचा गैरफायदा घेत चोरटे गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढत असल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या सात महिन्यांत कोकण मार्गावरील खेड हद्दीत तब्बल १४ महिला प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास (Crime) केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या एकाही चोरीचा अद्याप छडा लागलेला नाही. रेल्वेगाड्यांमधून प्रवास करताना प्रवासी बेसावध असल्याची संधी साधून चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व इतर दागिने हातोहात हिसकावून पलायन करत आहेत.
अनेक महिला प्रवासी दागिने घालून प्रवास करत असल्याने चोरट्यांना सहज संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः मध्यरात्रीच्या सुमारास प्रवासी गाढ झोपेत असताना आणि एक्सप्रेस गाड्या कॉसिंगसाठी थांबत असताना या चोरीच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे. कोकणकन्या व तुतारी एक्स्प्रेस या गाड्यामध्ये दागिने चोरीच्या घटनाचे प्रमाण अधिक असलयाचे स्पॉट झाले आहे.
स्वप्न राहिले अधुरे! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू; ‘या’ ठिकाणी घडला अपघात
जानेवारीमध्ये १, फेब्रुवारीमध्ये २. मार्चमध्ये ३. एप्रिलमध्ये २. जूनमध्ये ३ आणि जुलै महिन्यात ३ अशा एकूण १४ चोरीच्या घटनांची नौद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनांमधून चोरट्यांनी लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास करत यंत्रणासमोर मोठे आव्हान उभे केले आहे, रेल्वेगाड्यांमध्ये सातत्याने घडणाऱ्या चौरीव्या घटनांचा छडा लागत नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चौरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाही रेल्वे पोलीस व संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.






