Crime News Live Updates
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर चक्क आमदारांच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या नाशिकमधील जेलरोड येथील निवासस्थानी चोरी झाली आहे. या प्रकरणी त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलकरीण संगीता श्याम केदारे (रा. जेल रोड) हिने कपाटातून एक लाख रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
19 Jul 2025 04:26 PM (IST)
वाल्मिक कराड शिक्षा भोगत असलेल्या बीड जिल्हा कारागृहात एका आरोपीकडून गांजासदृश पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कारागृहामध्ये अंमली पदार्थांची तस्करी कोण करतंय? याबाबत विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे. संबंधित न्यायालयीन बंदीकडून गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला असून, दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई आणि पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 Jul 2025 04:25 PM (IST)
माढ्याच्या अरण गावातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात अपहरण झालेल्या दहा वर्षांच्या शाळकरी मुलाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. दगडाने ठेचून या शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली आहे. कार्तिक बळीराम खंडागळे असं हत्या झालेल्या मुलाच नाव आहे. कार्तिक हा 15 जुलै रोजी याच शाळेच्या मैदानावरून अचानक गायब झाला होता. प्राथमिक अंदाजानुसार कार्तिकचं अपहरण झालं असावा, असा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला होता. दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलिसांनी आणि कुटुंबियानी शोध घेतला मात्र कार्तिकचा कुठेही शोध लागला नाही. दरम्यान, चार दिवसानंतर अखेर कार्तिक खंडागळेचा आज मृतदेह आढळून आला आहे. कालव्यात हा मृतदेह सापडून आला असून यात अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र या हत्येचे नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या टेंभुर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. तर शाळकरी मुलाच्या कुटुंबियांमध्येही दहशत निर्माण झाली आहे.
19 Jul 2025 03:45 PM (IST)
कांकेर: छत्तीसगड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. वेगाने जाणारी कार काम सुरू असलेल्या पुलाला जाऊन धडकली. हा अपघात नेमका कसा घडला आहे ते जाणून घेऊयात. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात मध्यरात्री भीषण अपघात घडला आहे. एक वेगाने जाणारी कार काम सुरू असलेल्या पुलाला जाऊन धडकली आणि त्या कारला भीषण आग लागली.
19 Jul 2025 03:43 PM (IST)
किरकोळ कारणावरून दोन दिवस डांबून ठेवत सलग अमानुष मारहाण करण्यात आली. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
19 Jul 2025 02:59 PM (IST)
कबनूर येथील रवी परीट यांच्या मालकीच्या खाेलीत बेकायदेशीरपणे विनपरवाना सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पाेलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये तीनपानी जुगार खेळणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेऊन राेख रक्कम, माेबाईल व माेटरसायकली व इतर साहित्य असा २ लाख १९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाेलिस काॅन्स्टेबल सुनिल दत्तात्रय बाईत यांनी फिर्याद दिली आहे.
19 Jul 2025 02:57 PM (IST)
कोल्हापूर: कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाचा ग्रामपंचायत सदस्य बेपत्ता असलेले लखन बेनाडे यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. लखनचे हात, पाय आणि शीर धडापासून वेगळं केलं आणि त्याच्या शरीराचे तुकडे पोत्यात भरून ते हिरण्यकेशी नदीत फेकल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
19 Jul 2025 01:34 PM (IST)
पवना धरणाच्या ठाकुरसाई रस्त्यावरून पायी निघालेल्या एकट्या महिलेला दुचाकीवर आलेल्या अनोळखी इसमाने तिला निर्जन भागात नेऊन बळजबरीने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अवघ्या २४ तासात त्या आरोपीला स्केचवरून शोधत बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना १५ जुलै रोजी भरदुपारी घडली होती. पावसामुळे रोडवर कोणी नसल्याचा फायदा घेऊन या आरोपीने हे अमानुष कृत्य केले. बाळू दत्तु शिर्के (रा. जिवन नं. ०१, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.
19 Jul 2025 01:32 PM (IST)
अकोल्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या बापानेच विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अकोल्याच्या जुने शहर पोलिसांनी बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून वर्ग मैत्रिणीच्या बापाला अटक केली आहे. हा प्रकार अकोला पातूर रोडवरील एका गावात जिल्हा परिषदच्या चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडला.
19 Jul 2025 01:00 PM (IST)
तलवारीने केक कापून व रात्रीच्या वेळी डीजे लावून नाच गाण्याच्या तालावर थिरकत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील दिंद्रुढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या उमरी गावात घडला आहे. पोलिसांनी हा प्रकार समाजात दहशत माजवण्याचा असल्याचे निरीक्षण नोंदवत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
19 Jul 2025 12:50 PM (IST)
अकोल्यात एका चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या बापानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अकोल्याच्या जुने शहर पोलिसांनी बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून वर्ग मैत्रिणीच्या बापाला अटक केली आहे. हा अकोला पातुर रोडवरील एका गावात जिल्हा परिषदच्या चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत हा सर्व प्रकार घडला आहे.
19 Jul 2025 12:40 PM (IST)
पुण्यातील बुधवार पेठ परिसारात एका ज्वेलरी शॉपमधून दागिने आणि ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी विश्रामबाग पोळी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास करून या प्रकरणी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून एकाला अटक केली आहे. आता करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लिखित जी (21, रा. कोलार, कर्नाटक) असे आहे. आरोपी हा मूळचा कर्नाटकाचा आहे. तो सराईत गुन्हेगार नसून तो अभियांत्रिकीचा टॉपर असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.
19 Jul 2025 12:32 PM (IST)
पुण्यात लोक गुन्हे करून त्याचे व्हिडिओ रील्सच्या माध्यमातून सोशल मिडीयावर टाकायचे आणि लोक त्यावर लाईक आणि कमेंट करायचे. त्यामुळे गुन्हेगारांना एक प्रकारे प्रोत्साहन मिळायचं, ही खूप दुर्दैवी बाब होती. मात्र, आता अशा प्रकारांवर आळा घातला आहे. असे रिल्स टाकणाऱ्यांवर आणि त्यांना लाईक करणाऱ्यांवर लगेचच कारवाई केली जाते. ज्यामुळे हे प्रमाण खूप कमी झाले आहे. अशा वागणुकीला थांबवून कायद्याला योग्य मान मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, ज्याचा शहराच्या व्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम झाला आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
19 Jul 2025 12:30 PM (IST)
Beed : बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आंदोलनकरते विविध मागण्या मान्य करण्यासाठी आत्मदहन किंवा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करतात.अशा वेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठा फौजफाटा तैनात करावा लागतो.त्यामुळे बंदोबस्तासाठी नेमलेल्या मनुष्यबळाचा खर्च वसूल करण्याची भूमिका बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घेतली आहे.
19 Jul 2025 12:20 PM (IST)
अकोला शहरात शुक्रवारी (१८ जुलै) ला दोन गटात वाद होत गॅंगवॉर झाला होता. हा गॅंगवॉर वर्चस्वाच्या लढाईतून झाला होता. यात ताल्वारीसह बंदुकीचा वापर झाला होता. या वादादरम्यान दोन गट आमने -सामने भिडले. गोळीबार करण्यात आला. एक हवेत गोळी फायर करण्यात आली होती. या संपूर्ण गॅंगवॉरमध्ये जवळपास ८ जण जखमी झाले होते. घटनस्थळावरून २ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. काही जखमी आरोपींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले आहे. ही घटना कृषी नगर परिसरात घडली आहे. दरम्यान आरोपींची घटनास्थळी पोलिसांनी धिंड काढली.
19 Jul 2025 12:15 PM (IST)
लुटपाट करण्यासाठी आलेल्या आरोपींनी विरोध करणाऱ्या सुरक्षारक्षकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास प्रजापतीनगरात घडली. वाठोडा पोलिसांनी खून आणि लूटपाट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली.कुणाल भैयालाल वानखेडे (वय 20) आणि घनश्याम ऊर्फ अनूप बबली वंजारी (वय 23, दोन्ही रा. भांडेवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या घटनेत एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. लक्ष्मण मुळे (वय 48, रा. भरतवाडा रोड, पारडी) असे हत्या झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
19 Jul 2025 12:05 PM (IST)
भांडारा जिल्ह्यातील साकोली येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका १५ दिवसीय नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर येऊ नये म्हणून १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर देखील तयार करण्यात आला आहे. या स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा लिहून घेतल्याचा खळबळजनक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. सध्या हे बाळ बाल संरक्षण समितीच्या ताब्यात असून ते एका शिशुगृहात ठेवण्यात आलं आहे.
19 Jul 2025 11:56 AM (IST)
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील महिला पोलिस हवालदारासह दोघांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका वकिलाकडे गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी आणि दोषारोपपत्रात मदत करण्यासाठी ही लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे. महिला पोलिस हवालदार राजश्री रवी घोडे आणि सहायक फौजदार राकेश शांताराम पालांडे अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.
19 Jul 2025 11:39 AM (IST)
चक्क आमदाराच्य घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरी दुसरं तिसरं कोणी नाही तर आमदाराच्या मोलकरीणबाई ने केली आहे. ही चोरी देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांच्या जेलरोड येथील निवासस्थानी चोरी झाली. या प्रकरणी त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणाऱ्या मोलकरीणचं नाव संगीता श्याम केदारे (रा. जेल रोड) असे आहे. हिने कपाटातून एक लाख रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
19 Jul 2025 11:24 AM (IST)
किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना पर्वती दर्शन भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आदेश संजय काळे (वय ४१, रा. पर्वती दर्शन) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमित काळे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.