Crime News Live Updates
पुण्यातील खराडी भागातील उच्चभ्रू सोसायटीत सुरु असणा रेव्ह पार्टीवर मारलेल्या पोलिसांच्या छापेमारीत रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. हाऊस पार्टीच्या नावाखाली या रेव्ह पार्टीमध्ये अंमली पदार्थ, हुक्का, दारूचे सेवन सुरु होते. यात सोसायटीतील एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरसह 3 महिला आणि दोन पुरुषांचाही सहभाग होता.
27 Jul 2025 06:04 PM (IST)
एक मोठी बातमी समोर आली आहे. कदमवाकवस्ती परिसरातील एका घरफोडीच्या गुन्ह्यात लोणी काळभोर पोलिसांनी केवळ ९ दिवसांत तपास करत मध्यप्रदेशातून अट्टल चोराला अटक केली आहे. प्रतिक हिराचंद लिडकर (वय ३१, रा. खंडवा, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
27 Jul 2025 05:47 PM (IST)
बारामती शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पित्यासह दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात रविवारी (दि २६) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारस घडली आहे. ओंकार राजेंद्र आचार्य (वय ३२, रा. सणसर, ता. इंदापूर) , सई ओंकार आचार्य (वय १०), मधुरा ओंकार आचार्य (वय ४) असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
27 Jul 2025 05:14 PM (IST)
म्हसवड येथील एका पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक काही दिवसांपूर्वी जमा झालेली लाखो रुपयांची रक्कम घेऊन फरार झाला होता. त्याला म्हसवड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रणजित नवनाथ सरगर (रा. दीडवाघवाडी, ता. माण) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
27 Jul 2025 04:56 PM (IST)
उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीने आई-वडील, आई आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. गाजीपूरमधील नंदगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. आरोपी आणि त्याच्या कुटुंबात काही काळापासून जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातून आरोपीने आज ही घटना घडवून आणली आहे. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
27 Jul 2025 04:25 PM (IST)
राज्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लष्कर तसेच कोंढवा भागात बंद घरे फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. लष्कर पोलिसांनी ही कारवाई केली असून, दोन गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. दोन गुन्हेगार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. आर्यन अजय माने उर्फ मॉन्टी (वय २१, रा. फुरसुंगी) व विशाल मारूती आचार्य (वय २५, रा. रामटेकडी) व ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, उपनिरीक्षक राहुल घाडगे, रमेश चौधर व त्यांच्या पथकाने केली आहे.
27 Jul 2025 04:17 PM (IST)
जीवित हानी टळली आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे घडली घटना घडल्याने प्रसंगावधान राखत नागरिकांना हलविण्यात आले सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
27 Jul 2025 04:10 PM (IST)
एका गॅस सिलेंडरमधील अतिज्वलनशीन वायू थेट दुसऱ्या गॅस सिलेंडरमध्ये भरण्याचा गोरखधंदा कारंजा शहरात सुरू होता. या प्रकरणातील काळाबाजारी संबंधित सिलेंडरची चढ्यादराने विक्रीही करत होता. हा धक्कादायक प्रकार तहसीलदारांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर उजेडात आला. या कारवाईत तब्बल 17 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. तसेच काळाबाजार करणाऱ्यावर कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
27 Jul 2025 03:50 PM (IST)
बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे प्रकरण कोल्हापूरच्या पुलाची शिरोलीत घडले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. कल्लेश चंद्रकांत खेकरे (वय २५, रा. लोहार गल्ली, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) व बाबू बाळू पवार (२०, रा. वारणा कडोली, ता. पन्हाळा ) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या दोन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
27 Jul 2025 03:25 PM (IST)
हॉटेलमध्ये बिअर पिल्यानंतर बिल देताना ९० रुपये जादा सांगितले म्हणून तेथील हॉटेलमधील एकाला वीट आणि लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता इथे परत दिसला तर तंगडे तोडून हातात देईल अशी धमकीही दिली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पंचायत समितीच्या माजी सदस्याचा समावेश असून, घटनेनंतर सर्वजण फरार झाले आहेत.
27 Jul 2025 02:58 PM (IST)
ताम्हिणी घाटातील खूनाचा उलगडा करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश आले असून, मोठ्या भावानेच हा खून केला असल्याचे समोर आले आहे. व्यसनाधीन भावाशी वादविवाद झाल्यानंतर मोठ्या भावाने त्याचा खून केला आहे. ताम्हिणी घाटात हा मृतदेह आढळून आला होता. नंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून या खूनाचा उलगडा केला आहे. ऋषिकेश अनिल शिर्के (वय २३, रा. गायकवाड चाळ, मावळे आळी, कर्वेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषीकेशचा मोठा भाऊ अनिकेत अनिल शिर्के (वय २६) याला अटक केली आहे.
27 Jul 2025 02:41 PM (IST)
ज्या बंगल्यात हे सर्व मुख्य आरोपी बसले होते, त्या आरोपींचे नंबर उपलब्ध केलेत आणि सीडीआरची मागणी केली. त्यातील काही सीडीआर प्राप्त झाले. मला जर न्याय मिळत नसेल तर मी कोणत्याही परीक्षा द्यायला तयार आहे आणि तसे पाऊल उचलण्याच्या मी तयारीत आहे. असा इशारा सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिला आहे. सीडीआर प्रमाणे हे कसे आरोपी होतात. राजकीय पक्षाच्या कार्यालयातून ही गुन्हेगारी कशी केली गेली, हे सीडीआरमार्फत स्पष्ट होणार आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी आरोपीने नेमका कोणाला फोन केला? हे सीडीआर मधून समोर येईल. असा दावाही धनंजय देशमुख यांनी केला आहे.
27 Jul 2025 02:14 PM (IST)
हडपसर भागातील टिपू पठाण टोळीतील मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील मियापुर येथून बेड्या ठोकल्या आहेत. फैयाज गफार बागवान (२८, मुळ रा. खाजा मंजिल गल्ली नंबर १७ च्या समोर, सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.
27 Jul 2025 01:46 PM (IST)
गुजरातमधील अहमदाबाद येथे दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान विद्यार्थिंनीचा मृत्यू झाला. ही वेदनादायक घटना शाळेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज तपासासाठी पाठवले आहे. ही घटना नवरंगपुरा परिसरातील सोम ललित शाळेची आहे. गुरुवारी घडलेल्या या दुःखद घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
27 Jul 2025 01:06 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी आली आहे. मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चार लाख ६३ हजारांचे २३ ग्रॅम १८ मिलीग्रॅम मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल संच असा सहा लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हर्षवर्धन राहुल धुमाळ (वय २०, रा. पठारे वस्ती, दुर्गामाता मंदिराजवळ, चंदननगर, खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
27 Jul 2025 12:54 PM (IST)
वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबारप्रकरणी गुरुवारी (दि २४) पहाटे पोलिसांनी संशयित आरोपी कैलास ऊर्फ बाळासाहेब हिरामण मांडेकर, गणपत बाजीराव जगताप, रघुनाथ शंकर आव्हाड या तिघांना पुण्यातून अटक केली आहे. यामध्ये भोर वेल्हाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा समावेश आहे. आरोपींना सोमवारी (दि २५) मोठ्या पोलिस बंदोबस्तात दौंड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (दि २८) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
27 Jul 2025 12:16 PM (IST)
पुण्यातील बाणेर भागात रिक्षा चालकाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी घेऊन जातो, अशी बतावणी करून रिक्षाचालकाने रिक्षात बसवले. त्यानंतर खडकीतील रेंजहिल्स परिसरात रेल्वे रूळाजवळ त्यांना जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
27 Jul 2025 11:45 AM (IST)
माणगाव पोलिसांनी ‘ट्युबक्राफ्ट प्रेसिजन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीतून सुमारे 33 लाख 10 हजार रुपयांची मशिनरी आणि इतर साहित्य चोरून नेणाऱ्या सहा आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. ही कारवाई गोपनीय माहिती आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे करण्यात आली, अशी माहिती माणगाव पोलिसांनी दिली आहे.
27 Jul 2025 11:44 AM (IST)
मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याने एकट्या जाणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. सदर घटना शुक्रवारी (ता. २५ जुलै) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तुंगार्ली येथे घडली आहे. या घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. याबाबत पीडित तरुणीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.