गेल्या काही दिवसांपासून पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घंटांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातील पीएमपीतील प्रवासी महिलांकडे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला येवरडा पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून एक लाख २५ हजारांची सोनसाखळी जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव सुशांत शंकर गायकवाड(वय २४, रा. साईनाथनगर, खराडी) असे आहे.
कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती; राज्य शासनाला ‘इतक्या’ कोटींचा आर्थिक लाभ
पीएमसी बसमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याच्या सूचना पोलीस उपयुक्त हिमंत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी दिल्या होत्या. प्रवासी महिलेच्या गळ्यातील चोरलेली सोनसाखळी विक्री करण्यासाठी गायकवाड येरवडा बाजारातील सराफी पिढीत येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विजय अडकमोल आणि नटराज सुतार यांना खबऱ्याने दिली. त्यांनतर पोलिसांनी सापळा लावून गायकवाडला पकडले. त्याच्याकडून सोनसाखळी जप्त करण्यात आली.
येरवडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रतिकांत नंदनवार, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, सचिन गवळी, महेंद्र शिंदे यांनी ही कामगिरी केली.
देवदर्शनास जाताना भीषण अपघात; 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यू तर 7 जण गंभीर