सासूच्या छाळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या (फोटो- istockphoto)
नीरा: नीरा (ता.पुरंदर) येथील विवाहित महिलेने सासूच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे.नीता सचिन निगडे (वय ३३) रा. वार्ड क्र. ६ नीरा असे विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी सासू विजया भगवान निगडे हिला अटक केली असून सासवड न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.तर तीची आता येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीता निगडे यांचे वडील सुभाष शंकर माने( रा. श्रीगोंदा (ता.आहिल्यानगर) यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विजया निगडे – जगताप मुळ रहिवासी वाणेवाडी (ता. बारामती) ही नीता यांना वेळोवेळी लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, सतत शिवीगाळ करणे, गरीब असल्याने हिनवणी करणे, मुलगा होत नाही म्हणून घालून पाडून बोलणे, नीताच्या साड्या जाळून टाकणे, नवीन फ्लॅट घेतलाय राहायला जाण्याआधी त्यासाठी माहेरून एक लाख रुपये आण म्हणून तगादा लावणे अशा प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून अखेर नीता यांनी नीरा येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी अधिक तपास करत आहेत. विजया निगडे हिला पोलिसांनी अटक करून सासवड न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तीला आता येरवडा कारागृहात पाठण्यात आल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२७ मार्च) रोजी माध्यमांना दिली आहे.
मावशीच्या घरात चोरी करणाऱ्या भाच्याला ठोकल्या बेड्या
मावशीच्याच घरात चोरी करणाऱ्या भाच्याला पोलिसांनी अवघ्या तीन तासांत बेड्या ठोकल्या आहेत. त्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
किरण राजेश कुंटे (वय २८, रा. धोबी घाट, कॅम्प) असे पकडलेल्या भाच्याचे नाव आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून लष्कर पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर आणि निरीक्षक (गुन्हे) प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल घाडगे, अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे यांनी कारवाई केली आहे.
मावशीच्या घरात चोरी करणाऱ्या भाच्याला ठोकल्या बेड्या; तीन तासात लावला गुन्ह्याचा छडा
तक्रारदार या घरकाम करतात. त्या कॅम्प परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा ओढून ठेवला होता. ही संधी साधत अज्ञाताने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी लष्कर पोलिसांत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता.