सांगलीतील मिरज येथील भरदिवसा गोळीबाराची घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे.
गोंदिया हादरला! जादूटोणाच्या संशयावरून 60 वर्षीय वृद्धाची हत्या, आरोपीला अटक
मिरज येथील मंगळवारपेठ चर्चसमोर असलेल्या सलून दुकानात बुधवारी दुपारी गोळीबाराची घटना घडली आहे. महात्मा गांधी चौकामधून मिरज मार्केटकडे जाणारा रस्ता शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असून, या रस्त्यावर चर्चसमोर सलून दुकान आहे. बुधवारी दुपारी दोन गटात जुन्या कारणातून वादावादी झाली. या वादातून दुकानाची मोठ्या प्रमाणावर तोडफोडही करण्यात आली. यावेळी संशयितांकडून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही इजा झाली नसली तरी गोळीबाराच्या घटनेने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती घेत या प्रकरणी फिर्यादीच्यावतीने तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सांगितले. तक्रार दाखल झाल्यानंतर संशयितांवर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले आहे.
लातूर हादरलं! ५० रुपयाची उधारी बेतली जीवावर; धारधार शस्त्राने वार….
लातूरमध्ये केवळ ५० रुपयांच्या उधारीच्या मागणीवरून चक्क एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी, विवेकानंद चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लातूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या किरकोळ उधारीमुळे घडलेल्या घटनेने लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.
पानटपरीवरील 50 रुपयांची उधारी मागितल्याचा कारणावरून वाद होऊन या वादातूनच बाचाबाची झाली. आणि या बाचाबाचीचा रूपांतर मोठ्या वादात झाला. त्यानंतर आरोपींनी धारदार शास्त्र असलेल्या सुरा आणि कोयत्याने चौघांवर हल्ला केला. त्यातील गंभीर जखमी गणेश सूर्यवंशी याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक रणजीत सावंत यांनी दिली.
ही घटना लातूरमधील बाभळगाव नाका परिसरातील म्हाडा कॉलनीत घडली. या घटनेची माहिती मिळताच लातूरच्या विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.किरकोळ उधारी मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातूनच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
नागपूरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या दोन घटना; सीसीटीव्हीत कैद