कर्जत/ संतोष पेरणे : काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर येतात अवघा ठाणे जिल्हा हादरुन गेला. याच संतापजनक घटनेची पुनरावृत्ती आता कर्जतमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमधल्या क्लिनर असलेल्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुली अवघ्या पाच वर्षांच्या आहेत.कर्जत तालुक्यातून त्या शाळेत येणारे विद्यार्थी यांना घेवून येणारी स्कूल बस मधील ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने आज सकाळी कर्जतचे पोलीस उप अधीक्षक आणि पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांची भेट घेण्यात आली.त्यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांनी निवेदन दिले. मनसेचे वतीने विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणावर दाखल झालेला गुन्हा फास्ट ट्रॅक वर चालविण्यात यावा.त्याचवेळी त्या स्कूल बसचा क्लिनर असलेल्या तरुणाला फाशीची शिक्षा व्हावी. पोलीस ठाणे हद्दीतील पाच वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर वदप येथे राहणारा तरुण करण दीपक पाटील हा गेले अनेक महिने लैंगिक अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे. त्या पिडीत मुलींच्या कुटुंबांनी आपल्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करायला आल्यावर उघडकीस आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कर्जतकरांच्या माध्यमातून त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणावर करण दीपक पाटील यावर जो पोक्सो कायद्या अंतर्गत जो गुन्हा नोंद केला आहे त्याचा तपास मा. न्यायालयात फास्टट्रक कोर्टात माध्यमात चालवावा आणि आरोपी करण दीपक पाटील याला मृत्य दंडाची शिक्षा मिळवून द्यावी आणि न्यायप्रक्रिया आणि पोलीसावर विश्वास आहे हे सिद्ध करावे असे आवाहन केले आहे. सदर बसचे चालक,बस मालक सदर शाळा प्रशासनावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून भविष्यात आशा प्रकाच्या गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांवर चाप बसेल अशी मागणी केली आहे. कर्जत तालुकातील सर्व शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयात शिकण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या बस शाळा, विद्यालय आणि महाविद्याल प्रशासनांनी ज्या बस उपलब्द करून दिल्या आहेत त्या बसचे बस मालक, बसचालक व बस मध्ये असणारे शालेय व बस कर्मचारी यांच्या चरित्राची पडताळणी करावी व त्या पडताळणीत करावी. आजपासून विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व बस मध्ये सी.सी.टी.व्ही. आणि जी.पी.एस. ट्राकिंग बंधनकार करावे तसेच सदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनच्या ह्या निवेदनाची आपण गांभीयनि दखल घेऊन करवाई करावी अशी मागणी मनसेचे वतीने करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील स्कूल बस मधून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्या जाणाऱ्या सर्व बसेस याची स्थिती वाहतूक नियम आणि चालक यांच्यासाठी घालून देण्यात आलेले नियम यांची तत्काळ तपासणी करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र कर्जत पोलीस उप अधीक्षक यांच्या कडून विभागीय परिवहन अधिकारी यांना देण्यात येणार आहे.संबंधित प्रकार घडलेली शाळा ही खालापूर तालुक्यातील असून त्या शाळेचे विद्यार्थी कर्जत शहरातील आहेत.या घटनेचा बोध घेवून कर्जत तालुक्यातील सर्व शाळा तसेच स्कूल बसेस यांचे मालक तसेच शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक कर्जत गटशिक्षण अधिकारी यांनी सोमवारी लावली आहे.त्या बैठकीत बसेस तसेच शाळांमध्ये लहान विद्यार्थी असल्यास महिला कर्मचारी यांची नियुक्ती करणे,शाळांचे मुख्याध्यापक यांचे सोबत पालकांचा समन्वय वाढवणे आदी गोष्टीवर चर्चा केली जाणार आहे.
स्कूल बसच्या कर्जत चौक रस्त्यावरून राजमुद्रा चौक ते सेंट जोसेफ स्कूल या दरम्यान त्या गाडीचा क्लिनर असलेला तरुण करण पाटील हा एप्रिल 2024 पासून काल पर्यंत विद्यार्थ्यांना घेवून मागे बसून त्यांच्या अंगाखंद्याशी अश्लील चाळे करीत होता.त्यामुळे पालकांच्या तक्रारीनंतर कर्जत पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74,115(2)सह बालकांचे लैंगिक अपराध यांच्यापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8,10,12 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर घटनेची माहिती 16 एप्रिल रोजी वदप गावात कळल्यानंतर करण पाटील याची त्याच्या घराच्या लोकांनी बेदम चोप दिला होता.त्यानंतर हा तरुण जीवे मारतील या भीतीने जंगलात पळून गेला होता आणि तेथे लपून बसला होता.रात्री साडे दहा वाजता पालक कर्जत पोलीस ठाणे येथे पोहचल्यावर कर्जत पोलीस वदप येथे पोहचले आणि स्थानिकांच्या मदतीने त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
सध्या हा तरुण कर्जत तहसील कार्यालय कचेरी येथील कोठडीत असून तेथे पालक वर्गाने जावून कोणताही गैरप्रकार करू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.हा गंभीर विषय असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे हे सायंकाळी कर्जत येथे येणार आहेत.दुसरीकडे सध्या या गुन्ह्यातील आरोपीला अटक झाली असून जिल्हा पोलिस अधीक्षक डी डी टेळे तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेंद्र गरड यांच्यासह तपासी अधिकारी महिला सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.