हिंगोलीमध्ये मनसे कार्यकर्ता अजिंक्य घुगे याचा अपघाती मृत्यू झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
हिंगोली : पिकअप आणि कारच्या अपघातात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली औंढा नागनाथ रोडवरील लिंबाळा मक्ता भागात हा अपघात झाला. पिकअप आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये हिंगोली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे हे जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
काल (दि.11) हिंगोलीमधील औंढा नागनाथ रोडवर हा अपघात झाला. 9 वाजणाच्या सुमारास हिंगोली पिंपरी लिंबाळा मक्ता परिसरामध्ये ही घटना घडली. अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेले मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कारमधून औंढा नागनाथ येथून हिंगोलीकडे येत होते. यावेळी कार आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचे इंजिन कारमधून बाहेर पडले असल्याचं दिसत आहे. यामुळे मनसेला आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजिंक्य घुगे वय वर्षे 25 असे या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अजिंक्य घुगे हा मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुठे यांचा भाचा होता. अपघाताचे स्वरुप भीषण असल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात कार (Mh 29BC5331) व पिकअप वाहन (MH46BM3136) या दोन वाहनांची समोरासमोर टक्कर झाली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अपघातावेळी मोठा आवाज झाल्यामुळे आसपासचे लोक घटनास्थळी जमा झाले. सदर घटनेची माहिती तातडीने ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्याम कुमार डोंगरे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले व घटनेचा पंचनामा केला. ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची रात्री उशिरा नोंद घेण्यात आली. दिनेश पोले, निखिल पराडकर अशी जखर्मीची नावे आहेत. या घटनेची माहिती कळताच परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
लातूरमध्ये तरुणाला रस्त्यावर मारहाण
लातूरमधील धक्कादायक व्हिडिओने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरवला आहे. तरुणाला नग्न करुन मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये सहा ते सात तरुण एका तरुणाला मारहाण करत आहेत. लातूरमधील एका बारमध्ये या तरुणांची पीडित मुलासोबत वाद झाला होता. मात्र यानंतर हा वाद विकोपाला गेला. तरुणाला टोळक्याने जबर मारहाण केली आहे. यामधील पीडित तरुण हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे आरोपी हे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या एका बारच्या पुढे हा थरार सुरू होता. याच ठिकाणी असलेल्या राजश्री बार आणि क्लबमध्ये काही तरुणांचा वाद झाला. हा वाद बारनंतर रस्त्यावर देखील झाला. रस्त्यावर टोळक्याने तरुणाला नग्न करुन मारहाण केली. याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.