पुणे शहरातून तडीपार केलेल्या तीन गुंडाना पकडले (संग्रहित फोटो)
पुणे : शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केल्यानंतर देखील पोलिसांच्या आदेशाचा भंग करून पुन्हा शहरात वावरणाऱ्या तीन गुंडांना पोलिसांनी पकडले आहे. सातत्याने तडीपार गुन्हेगार पुन्हा शहरात येत असल्याचेही यावरून दिसून येत आहे. मंडईतील वाहनतळ, येरवडा, तसेच कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली.
महात्मा फुले मंडई परिसरात साहिल रफीक कलादगी (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला पकडण्यात आले आहे. याबाबत सहाय्यक पोलिस फौजदार अविनाश इंगळे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस हवालदार गोंजारी तपास करत आहेत. तसेच, दुसऱ्या कारवाईत आंबेगाव पोलिसांनी जांभुळवाडी तलाव परिसरातून तडीपार गुंड तुषार कृष्णा कुचेकर (वय २१, रा. शनिनगर, कात्रज) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई शिवाजी आटोळे यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस हवालदार मोरे तपास करत आहे.
दिवसाढवळ्या शाळेत शिक्षिकेची हत्या; 20 हून अधिक चाकूने वार अन् नकाबपोशाचा हल्ला CCTV कॅमेरात कैद
तर, येरवडा भागातील तारकेश्वर मंदिराजवळ शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला सराईत शशी पांडू चव्हाण (वय ४३, रा. सेवालाल चौक, येरवडा) याला ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलीस शिपाई राहुल परदेशी यांनी लक्ष्मीनगर पोलिसांत तक्रार दिली असून, हवालदार निलख तपास करत आहेत.
गंभीर गुन्हे दाखल असल्यास तडीपारीची कारवाई
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सराईतांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात येते. या कालावधीत त्यांना शहरात येण्यास बंदी घालण्यात येते. मात्र, तरीही हे तिघे बेकायदेशीर शहरात दाखल झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
प्रियकराने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून
उत्तर प्रदेशातील नौचंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी उघड्या गटारात सापडलेल्या सहा महिन्यांच्या मुलाच्या मृतदेहामागील गूढ पोलिसांनी अखेर उलगडले आहे. पोलीस तपासादरम्यान समोर आलेल्या तथ्यांमुळे नातेसंबंध, आईचे प्रेम, माणुसकी आणि विश्वास हे सर्व प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत. इन्स्टाग्रामवर जुळलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्या नात्याची किंमत सहा महिन्यांच्या साहिलला आपल्या प्राणांनी चुकवावी लागली.
दोन वर्षे करत होता पाठलाग, अपहरण अन् अखेर खून… शिक्षिकेची हत्या करणाऱ्या सनकीची संपूर्ण कहाणी






