यानंतर आरोपी पसार झाले. बंटी ऊर्फ बुरहान शेख (रा. आवस्थीनगर चौक) आणि साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. गुड्डु हा वाहनचालक होता. ती पूर्वी बजरंग दलाच्या अवस्थीनरगर शाखेचा अध्यक्ष होता. गुड्डू आणि बंटीमध्ये जुने वैमनस्य होते. दोघांविरोधात मानकापूर ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, सुत्रांनुसार, गुड्डूचा भाऊ संदीपने आरोपीचा साथीदार राहुले वैरागडेकडून १० हजार रुपये उसणे घेतले होते. २१ जानेवारीच्या रात्री पैशांवरून दोघांत वाद झाला. दुसऱ्या दिवशी गुड्डूने घरी जाऊन त्याची आई आणि भावाला धमकावले, याबाबत माहिती झाल्यानंतर बंटीने गुरुवारी रात्री गुड्डूला पोलिस मुख्यालयाजवळ गाठले, बेटीने सहकाऱ्यांसह गुड्डूवर हल्ला केला. घाबरून गुड्डूचे मित्र मिलिंद आणि आदित्य पळाले, आरोपींनी गुड्डूवर सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले आणि पसार झाले. पोलिसांनी गुड्डूला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृताच्या मित्राच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी सकाळी बजरंग दलाचे कार्यकर्ते गिट्टीखदान ठाण्यात गोळा झाले. प्रदर्शन करीत आरोपींना अटक आणि कठोर कारवाईची मागणी केली. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, गुहुने मुख्य आरोपीच्या पानठेल्यावर सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांना विरोध केला होता. त्यामुळेच हत्या केली.






