गोंदियाकरांच्या आरोग्याशी खेळ! अनियंत्रित पाणी व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल
गोंदिया शहरात मंगल कार्यालयांपासून ते शासकीय, निमशासकीय कार्यालयापर्यंत कुलजारमधून पाणीपुरवठा होतो. रोजच्या रोज लाखो गोंदियाकर हे पाणी पितात. टेम्पोमध्ये कुलजार भरून त्यांची वाहतुक करतानाचे चित्र आपण दररोज रस्त्यांवर बघतो. पण, हे पाणी कुठे भरतात, ते कसे भरतात, त्याची गुणवत्ता काय, या प्रश्नांचे उत्तर सद्या शासकीय यंत्रणेकडे नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे…; काँग्रेसचा आरोप
बाटलीबंद पाणीपुरवठा करणारी एक यंत्रणा तर कुलजारमध्ये रोजच्या रोज पाणी पोचविणारी दुसरी व्यवस्था आहे. पाण्याचे जार मंगल कार्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच छोट्या मोठ्या दुकानांमधून रोज भरून पोहोचविण्याच्या सुविधा हे व्यावसायिक देतात. रिकामे जार घ्यायचे आणि त्या जागी पाण्याने भरलेले जार ठेवायचे. अशी ही व्यवस्था आहे.
यापैकी बाटलीबंद पाणी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी आहे. त्यासाठी बीआयएस ब्युरो ऑफ इंडियन स्टैंडर्ड चा क्रमांक त्यावर असतो. हे जार पारदशी असतात. माञ, कुलजार पारदशी नसतात. त्यामध्ये भरणाऱ्या पाण्याच्या व्यवसायाची नोंद नसल्याची माहिती पुढे आली आहे. नागरिकांना शुद्ध पेयजल पुरविणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. कूलजारमधून विक्री होणारे पाणी पंकज डिकिंग वॉटरमध्ये येत नाही. त्यामुळे त्यावर एफडीएला नियंत्रण ठेवता येत नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.
दिवसभरात किमान पंधरा ते वीस हजार कूलजार विक्रीचा प्राथमिक अंदाज आहे. एका जारची किंमत ३० रूपये या आधारे शहरात कूलजारची वर्षाला उलाढाल चार ते पाच कोटी रुपये इतकी आहे.
Jay Pawar PC: राजीनामे, नाराजीनाट्य…? जय पवारांची पत्रकार परिषद रद्द होण्याचं नेमकं कार
कायदेशीर मान्यता द्या
आम्हालाही नोंदणी करायची आहे. पण, ती कुठे करायची, याची माहिती कोणत्याच सरकारी यंत्रणेकडे नाही. कुलजारच्या व्यवसायातून हजारो हातांना काम मिळाले आहे. त्यामुळे आमच्या व्यवसायाला कायदेशी मान्यता द्यावी, अशी अपेक्षा नाव न सांगण्याच्या अटीवर यातील व्यावसायीकांनी केली आहे.
का होत नाही नोंद
अन्न व सुरक्षा व मानके कायद्यामध्ये केवळ बाटलीबंद पाण्याचा समावेश केला आहे. त्यामुळे सीलबंद बाटलीतून होण्याऱ्या पाण्याची गुणवत्ता राखण्यापर्यंतच एफडीएवर जबाबदारी आली आहे. कूलजारमध्यून पुरवठा होणारे पाणी हे कायद्याच्या दृष्टीने लूज वॉटर आहे. त्याची नोंद एफडीएमध्ये होत नाही.






