नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४४ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ८ जुलैला गोटावळे गाव, रबाळे येथे ही घटना घडली आहे. महिलेने राहत्या घरी आत्महत्या केली. मृतकाच्या मुलीने तिचा लिव्ह-इन पार्टनर विरोधात तक्रार दाखल केली आहे. रबाळे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच दमबाजी, मारहाण आणि खाजगी फोटो- व्हिडीओ वायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
फिरायला जाणं बेतलं एकाच्या जीवावर, डॅममध्ये पोहायला गेलेल्यापैकी एकाचा बुडून मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतील संदीप जाधव (३७) हा मृत महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. संदीप या महिलेला विश्वासात घेऊन तिच्याकडून १० लाख रुपये उकळले. त्यानंतर महिला त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली. म्हणून आरोपीने तिचे खाजगी फोटो व व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना व्हायरल करण्याची धमकी दिली होती.इतकेच नव्हे तर आरोपी संदीपने महिलेच्या दोन्ही मुलींना सतत फोन करून अश्लील व दमदाटीचे संदेश पाठवले व धमक्या दिल्या. तसेच, पीडितेला वारंवार मारहाण व शारीरिक चाल केल्याचीही माहिती आहे. याच याच मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आत्महत्या केली. असा आरोप मृत महिलेच्या मुलीने तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी रबाळे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेले नाही आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान नवी मुंबई येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात तब्बल १४०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यासाठी कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र त्यातील सुमारे ८०० कॅमेरेच सध्या कार्यरत आहेत. उर्वरित शेकडो कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या हेतूने हे कॅमेरे लावण्यात आले आहेत तो हेतू सध्य होत नसल्याचं दिसून येत आहे. पोलिसांच्या गुन्हे तपास कामात या सीसीटीव्ही फुटेजचा मोठा आधार असतो. गुन्ह्याच्या ठिकाणी किंवा त्या परिसरातील कॅमेऱ्यात आरोपींच्या हालचाली कैद झालेल्या असतात. तसेच आरोपीची तंतोतंत ओळख पटवण्यासाठी हे कॅमेरे महत्वाची भूमिका बजावतात. मात्र शहरातील अनेक कॅमेरे बंद स्थितीत असल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. त्यामुळे तपासासाठी दिवस रात्र मेहनत घेऊनदेखील कधी पुरावे मिळत नाहीत. तर पोलिसांना आरोपीची ओळख पटवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.