प्रसिद्धीसाठी स्टंट केला, पोलिसांच्या कारवाईनं मात्र अद्दल घडवली
सावन वैश्य, नवी मुंबई: एका इनोवा गाडीच्या डिक्कीतून एका व्यक्तीचा हात बाहेर लटकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया तसेच प्रसार माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत होता. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी तात्काळ या गाडीचा शोध घेऊन चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोक आजकाल प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या प्रकारे स्टंट करून अथवा शक्य लढून व्हिडिओ काढतात व व्हायरल करतात. काही लोकांचा व्हिडिओ व्हायरल होऊन त्यांच्या चांगल्या कामाची दाद मिळते, तर काहींना नेटकरांच्या रोशाला सामोरे जावे लागते. अनेकदा काही लोक समाजातील शांतता भंग होईल अशा प्रकारचे विषय घेऊन व्हिडिओ बनवतात, आणि वायरल करतात. अशा व्हिडिओंचा पोलीस विभागाकडून चांगलाच समाचार घेतला जातो. अशा प्रकारच्या चार व्हिडिओ निर्मातांवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. वाशी रेल्वे स्थानक ते सानपाडा रेल्वे स्थानक या मार्गावर एका इनोवा गाडीतून एका इसमाचा हात बाहेर आल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
हा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाल्यावर, पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेऊन मीनहाज मोहम्मद अमीन शेख, वय 25 वर्ष, शहावार तारीख शेख, वय 24 वर्ष, मोहम्मद अनस अहमद शेख, वय 30 वर्ष, इंजमाम अख्तर रजा शेख या चौघांचा एक इनोवा गाडी ताब्यात घेतली आहे. चौघांची चौकशी केली असता त्यांनी लॅपटॉप विक्री बाबतच्या प्रमोशनचा व्हिडिओ रिलीज बनवण्याच्या हेतूने केला असल्याची माहिती समोर आली आहे. सानपाडा पोलिसांनी वाहन चालकावर मोटार वाहन अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस घेत आहेत.