काय घडलं नेमकं?
गणेश हा सायंकाळी शहरालगत असलेल्या एका हॉटेलच्या स्वीमिंगपूलमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता, पोहताना अचानक तो पाण्यात बुडू लागला. या दुर्घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. हॉटेलच्या स्विमिंग पुलातील पाण्यात गणेश बुडत असल्याचे पाहत त्याच्या मित्रांसह उपस्थितांना त्याला बाहेर काढून प्राथमिक उपचार दिले. त्यांनतर, तातडीने कारमधून हॉस्पिटलकडे नेण्यात येत होते, यावेळी शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर महामार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे मोठी गैरसोय झाली. त्यामुळे, काही तरुणांनी गणेशला खांद्यावर घेऊन हॉस्पिटल गाठले. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.
पुण्यात ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
फरार निदा खान अखेर जेरबंद! संभाजीनगरमध्ये मध्यरात्री मोठी कारवाई
नाशिकच्या टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मांतर प्रकरणातील फरार असलेली मुख्य सूत्रधार निदा खानला अटक करण्यात आली आहे. नाशिक एसआयटी आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून गेल्या 40 दिवसांपासून निदा खान पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर छत्रपती संभाजीनगरमधून तिला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष बाब म्हणजे ती अशा ठिकाणी लपली होती, जिथे पोहचणे पोलिसांसाठीही मोठे आव्हान होते.
अटकेपासून वाचण्यासाठी निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कौसर कॉलनी परिसरात लपून बसली होती. ती ज्या इमारतीत लपून बसली होती, त्या इमारतीच्या आजूबाजूला दूरदूरपर्यंत एकही घर नव्हते. हा परिसर फारसा वर्दळ नसलेला आणि निर्जन भाग असल्यामुळे कोणाला संशयही येणार नाही, असे तिला वाटले होते. त्यामुळे पोलिसांपासून वाचण्यासाठी ती या इमारतीत लपून बसली होती.
सोशल मिडीयावरील ओळख महिलांना पडली महागात; सायबर चोरट्यांकडून तब्बल 13 लाखांची फसवणूक






