nashik (फोटो सौजन्य- pinterest)
माहेश्वरी कांबळे या दीड वर्षीय चिमुरडीच्या उपचारावेळी हलगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जाळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या (Doctor) चौकशी समितीच्या अहवालात डॉक्टर दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र अहवालात दोषी डॉक्टरांचे नाव न देण्यात आल्याने डॉक्टरांना जिल्हा रुग्णालय प्रशासन पाठीशी घालतंय का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरुडमधील नागरिकाची फसवणूक; तब्बल 23 लाखांना घातला गंडा
नेमकं काय प्रकरण?
दि. १४ जून २०२४ रोजी सकाळी चुंचाळे शिवारात राहणारी माहेश्वरी हिच्या अंगावर उकळते पाणी सांडले होते. त्यामुळे तिला उपचारासाठी मआविवि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. यात ती २५ टक्के भाजली गेल्याने तिला उपचारासाठी जळीत कक्षात दाखल करण्यात आले होते. यात ती २५ टक्के भाजली गेल्याने तिला उपचारासाठी जळीत कक्षात दाखल करण्यात आले. परंतु कक्षातील उपस्थित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्याकडून तिच्यावर पुरेसे औषधोपचार व सलाईन देण्यात आले नाही. त्यामुळे माहेश्वरीचा 16 जून रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
यासंदर्भात माहेश्वरीचे पालक अमर संदीप कांबळे व आरती कांबळे यांनी जळीत कक्षातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी तक्रार केली होती. तसेच, याबाबत पोलिसांकडेही दाद मागितली होती. त्याची गंभीर दखल घेण्यात आली. जानेवारी २०२५ मध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांनी आठ तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी समिती नेमली होती.
रुग्णालय दोषी डॉक्टरांना पाठीशी घालतय
या चौकशी समितीने या प्रकरणाची चौकशी करीत अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर केला. यात जळीत कशाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारात हलगर्जीपणा केला असल्याचे डॉ शिंदे यांनी सांगितले. सदरचा चौकशी अहवाल बंद लिफाफ्यात पोलिसांना देण्यात आला आहे. त्यानुसार डॉक्टरसह इतरांवर गंभीर गुन्हा नोंदविला जाणार आहे. मात्र कोणत्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला त्यांची नावे जिल्हा रुग्णालयाच्या अहवालात नसल्यामुळे रुग्णालय या दोषी डॉक्टरांना पाठीशी घालतय का? असा सवाल यानिमित्त उपस्थित केला जात आहे.