पत्नीने केला पतीचा खून (फोटो - istock)
सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाची हत्या झाली. या हत्येप्रकरणाची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संशयितांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित योगेश नंदकुमार खवळे आणि एक जण फरार आहे.
गुरुवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणातून अक्षय दिलीप माने (रा. धनगरवाडी, ता. सातारा) यांचा कोडोली, सातारा येथील पाच एकराच्या मोकळ्या प्लॉटमध्ये धनंजय यादव, प्रथमेश उर्फ पत्या रमेश चव्हाण, योगेश नंदकुमार खवळे, रोहन नामदेव जाधव आणि त्यांचा एक मित्र (सर्व रा. कोडोली, ता. सातारा) यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे. खुनाची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली आहे.
हेदेखील वाचा : Vaishnavi Hagwane Case : हगवणे बंधुंना पिस्तुलाचा परवाना कसा मिळाला? वाचा संपूर्ण घटनाक्रम
दरम्यान, संशयितांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित योगेश नंदकुमार खवळे आणि एकजण फरार आहे. त्यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. खुनाच्या या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करत आहेत.
राज्यात वाढतंय गुन्हेगारीचे प्रमाण
राज्यात गुन्हेगारी वाढली असून, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह सर्व्हिस रोडलगत असलेल्या नाल्याजवळ टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही हत्या कोणी आणि कशामुळे केला, हे स्पष्ट झालेले नसून, त्याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
अकोल्यात काकानेच केला पुतण्याचा खून
अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामध्ये दारूच्या वादातून काकानेच आपल्या पुतण्याची दगडाने ठेचून हत्या केली आहे. कुणाल किशोर कमलाकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो जास्त प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता. त्यातूनच झालेल्या वादातून काकाने कुणालची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.