CRIME (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
ऑपरेशन सिंदूर यशश्वी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. ऑपेरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानविषयी प्रेम दाखवणाऱ्या तरुणाला देशप्रेमीला रत्नागिरीकरांना चोप दिला आहे. पाकिस्तान जिंदाबाद लिहिणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची निंदा करणाऱ्या तरुणाला रत्नागिरीकरांनी चोप दिला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून शहर पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पालघर हादरलं! पोटच्या मुलाला आधी संपवलं मग स्वतः देखील आत्महत्या केली…
पाकिस्तानविषयी प्रेम दाखवणाऱ्या तरुणाला देशप्रेमी रत्नागिरीकरांनी त्या तरुणाला चोप दिला आहे. तरुणाचा नाव महम्मद बद्रुद्दीन परकार असं आहे. तो २१ वर्षाचा असून तो चिपळूणचा राहणार आहे. ही घटना बुधवारी घडली रात्री समोर अली आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून शहर पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच तो ज्या आस्थापनेत कामाला होता तेथून त्याला काढून टाकण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६ आणि ७ मे च्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करत दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्वस्त केली. यावर एका मुस्लिम युवकाने उघडपणे ‘पाकिस्तान जिंदाबाद, मोदी किलर आहे. मोदींमुळे हे घडत आहे. पाकिस्तानसाठी प्रार्थना करा’ असे स्टेटस या तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपला ठेवले होते. त्यानंतर ते वायरल केले होते. तयामुळे खळबळ उडाली होती.
ही गोष्ट देशप्रेमी रत्नागिरीकरांच्या लक्षात आली. तो तरुण काम करतो त्या आस्थापनेत जाऊन रत्नागिरीकरांनी माहिती घेतली असता त्या युवकाला स्टेटसमुळे आदल्या दिवशीच कामावरून काढून टाकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या युवकाला देशप्रेम शिकवण्याचा निश्चय केलेल्या रत्नागिरीकर देशप्रेमी तरुणांनी त्या तरुणाला आज शोधून काढले. त्यानंतर त्याला चोप देण्यात आला. त्याने त्यानंतर भारत माता की जय असे म्हंटले.
रत्नागिरीकर देशप्रेमी तरुणांनी चोप दिल्यानंतर पोलिसांनी तरुणाला जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने दंगा काबू पथकाला पाचारण केले आहे. दंगा काबू पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयाचा ताबा घेतला होता. शहर पोलिस निरीक्षक शिवरेकर यांच्यासह पोलिस पथकही याठिकाणी दाखल झाले होते. शहर पोलिस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nagpur Crime: देशविरोधी कारवायांप्रकरणी नागपुरात पत्रकारास अटक; पोलिसांकडून चौकशी सुरू