पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या भांडण्याच्या कारणावरून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी रात्री १०:३० च्या सुमारास घडली आहे. केवळ काही तासातच पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दोन लग्न होऊनही प्रेम प्रकरण, फिरायला गेले, जेवणही केले आणि मग…, आंध्रप्रदेशातील धक्कादायक घटना!
मृतकाचे नाव सोहम सचिन शिंदे (वय 17) असे नाव आहे. तो दिघीतील वरमुखवाडी परिसरात आपल्या मित्रांसोबत “केकीज” नावाच्या केक दुकानासमोर गप्पा मारत बसला होता. त्याचवेळी दुचाकीवरून काही युवक तिथे आले आणि त्यांनी एक वर्षांपूर्वी झालेल्या जुन्या वादाचा राग सोहमवर काढला. आरोपींची त्याला आधी शिवीगाळ केली आणि त्याच्यावर धारधार कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात सोहम गंभीर जखमी झाला. त्यानंतर काही क्षणातच सोहमचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई केली. निलेश शिंदे, शुभम पोखरकर आणि सुमित शिंदे या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी पोलिसांना हत्या केल्याचा कारण एका वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून झालेला वाद सांगितल आहे. या प्रकारनाचा अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहे.
भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या
पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरातील कृष्णाईनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १८ वर्षिय तरुणीला भररस्त्यात थांबून दोन तरुणांनी हत्या केली. ही हत्या रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून या घटनेचा सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आलं आहे. तरुणीचं नाव कोमल जाधव आहे. आरोपी हे दिल्लीचे असल्याचे समोर आले आहे.
फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी, एम.डी जप्त, ४ महिलांसह चार पुरुष मित्रांना अटक; नागपूर पोलिसांची कारवाई