File Photo : Jat Police
जत : जत शहरात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 51 हजारांचा मुद्देमालही जत पोलिसांनी जप्त केला आहे.
हेदेखील वाचा : लिव्ह-ईन रिलेशनच्या कारणातून तरुणाला बेदम मारहाण; जबड्याचे हाड फ्रॉक्चर
पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक रितु खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांनी आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी आदेश व मार्गदर्शन केले आहे.
त्याप्रमाणे जत पोलिसांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाला अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे लोकांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांना एक इसम पिस्टलसह नागजकडे जाणाऱ्या रोडलगतच्या स्मशानभूमीजवळ, जत येथे येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नागजकडे जाणाऱ्या रोडलगतच्या स्मशानभूमीजवळ, जत येथे जाऊन सापळा लावला.
गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करणार
जत शहर व परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करून त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना चाप लावला असून, भविष्यात देखील सांगली जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर परिणामकारक तसेच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
– बिरप्पा लातुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक
हेदेखील वाचा : इमारतीत जाण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकाला मारहाण; जिम ट्रेनरला अटक, मुंबईतील घटना