Nashik TCS Conversion Case: फरार निदा खान अखेर जेरबंद! संभाजीनगरमध्ये मध्यरात्री मोठी कारवाई
काय घडलं नेमकं?
या प्रकरणी मृत तरुणाचे नाव हमीद शेख असे असून त्याचा मावसभाऊ अर्षद शेख हा गंभीर जखमी झाला आहे. अनिकेत सूर्यवंशी आणि त्याचा भाऊ विशाल सूर्यवंशी यांनी धारदार शस्त्राने वार करत दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हमीद शेख याचा जागीच मृत्यू झाला, तर अर्षद याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अनिकेत सूर्यवंशी याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विशाल सूर्यवंशी हा फरार होता त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.
हत्येमागच कारण काय?
हमीद शेख हा अवघ्या पाच दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. चार महिन्यांपूर्वी त्याने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हमीद जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा संबंधित तरुणीला त्रास देईल, अशी भीती मुलीच्या कुटुंबीयांना होती. संबंधित तरुणीचे कुटुंबीय आणि आरोपी सूर्यवंशी बंधू हे एकमेकांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीच्या आईने हमीद बाहेर आल्याबाबत चिंता व्यक्त करत आरोपींकडे भीती बोलून दाखवली होती. त्यानंतरच हा हल्ला झाला. या घटनेचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Nagpur Crime: नागपुरात वासनांध विकृतीचा कळस! मुलानेच केला सावत्र आईवर अत्याचार






