काय घडलं नेमकं?
शुक्रवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर बाईकवरून एजे मॉलच्या समोर आले. त्यांनतर दोघांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून मॉलच्या दिशेने पाच ते सहा राऊंड फायर केले. या सगळ्या गोळ्या मॉलच्या नेमप्लेटवर झाडण्यात आल्या. यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची कसून तपासणी करत फॉरेन्सिक नमुने गोळा केले. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांनी दिली. या गोळ्यांमुळे मॉलची काच फुटली आहे. जवळपास 5-6 गोळ्या झाडल्याचे दिसत आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी
या घडलेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या शुभम लोणकरने स्वतः घेतली आहे. शुभम लोणकरने या प्रकरणाची फेसबुक पोस्ट केली आहे. या अनुषंगाने लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ आरजू बिष्णोई याच्या नावाने एक ऑडिओ समोर आलाय. जो आमच्या विरोधात आहे, त्याची आणि आमची लवकरचं भेट होईल. असा इशारा ही या ऑडिओद्वारे देण्यात आलाय. हा ऑडिओ खरंच लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित आहे का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ‘एजे’ फर्निचर मॉल चे मालक अशोक नैन हे एमडी ड्रग्स तस्कर असल्याचा उल्लेख करत हा केवळ ट्रेलर आहे, यानंतर थेट गोळी डोक्यात असेल, असा इशारा बिश्नोई गँगकडून देण्यात आला आहे.
Ans: AJ फर्निचर मॉल, पिंपरी-चिंचवड येथे ही घटना घडली.
Ans: हल्लेखोरांनी मॉलच्या दिशेने 5 ते 6 राऊंड फायर केले.
Ans: लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकरने फेसबुक पोस्टद्वारे जबाबदारी स्वीकारली.






