दरोड्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना अटक (संग्रहित फोटो)
पुणे : राज्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. मालकाची लग्नमंडपाच्या कामाची रोख रक्कम चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १५ लाख ६ हजार किंतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सलमान यासीन पठाण (३२, रा. ईसा हाईट्स, शिळफाटा, मुळ रा. पाली, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे, पोलिस हवालदार दाऊद सय्यद, अमंलदार शाहिद शेख व प्रदिप बेडीस्कर व त्यांच्या पथकाने केली आहे.
तक्रारदारांकडे पठाण हा चालक म्हणून नोकरीस होता. त्यावेळी तक्रारदारांनी मजुरांना पगारासाठी आणलेले पैसे गाडीतुनच चोरीस गेले होते. आरोपी गुन्हा दाखल केल्यापासून पसार झाला होता. आरोपीने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला होता. यादरम्यान मिरज-सांगली, बीड, पुणे ग्रामीण, मुंबई, मुंब्रा, ठाणे परिसरामध्ये आरोपी त्याचे अस्तित्व लपवुन फिरत होता. पोलिसांचे पथके त्याचा शोध घेण्यासाठी संबंधित शहरांमध्ये गेले होते. परंतु, आरोपी तेथुनही पसार होत होता.
आरोपी हा त्याचे मोबाईल लोकेशन काढले जाईल यामुळे तो रस्त्यावर कोणाकडूनही मोबाईल घेऊन त्याच्या घरी फोन करत होता. त्यामुळे याआधारे मोबाईलचा माग काढल्यास आरोपी सापडत नव्हता. या आधारे पोलिस हवालदार प्रतिक लाहिगुडे यांनी आरोपीचे लोकेशन काढले. तेव्हा तो मुंब्रा भागात असल्याचे समजले. त्यानूसार, पथकाने त्याला सापळा रचून मुंब्रा येथील शिळडायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, चार चाकी गाडी असा १५ लाख ६ हजारांचा ऐवज जप्त केला.
हे सुद्धा वाचा : मोक्काच्या गुन्ह्यातील ‘वाँटेड’ आरोपी अखेर अटकेत; खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई
वाईत भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फाेडली
वाई तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसाखाली वाईच्या गंगापुरीतील सृष्टी अपार्टमेंटमधील बंद सदनिका हेरून सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान चोरट्यांनी कुलुप तोडले, आत प्रवेश करुन कपाटातील सोने आणखी दिड लाख रुपये रोख घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तेथीलच आणखी एका फ्लॅटचे कुलूप तोडून तेथील कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. दिवसाढवळ्या वाई शहरात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.