पुणे रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई (फोटो- टीम नवराष्ट्र)
स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्म्स, प्रवेश व निर्गम मार्गांवर आरपीएफ पथके तैनात करण्यात आली. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या मोहिमेदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर संशयित एक पुरुष व एक महिला दिसून आले. त्यांना त्वरित ताब्यात घेऊन आरपीएफ पुणे पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान पुरुषाने आपले नाव मुन्ना कुमार राजभर (वय २४ वर्षे), रा. कोपा समोटा, पोलीस स्टेशन कोपा, जिल्हा छपरा, बिहार असे सांगितले. तर महिलेस आपले नाव पूनम देवी (वय ३० वर्षे), रा. दया छपरा, पो.स्टे. रघुनाथपूर, जिल्हा सिवान, बिहार असे सांगितले.
गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीसांचा ‘ॲक्शन प्लॅन’; महासंचालक कार्यालयाला पाठवणार प्रस्ताव
त्या अनुषंगाने संबंधित महिलेला अधिकृतरित्या अटक करण्यात आली आणि ७ महिन्याच्या बालकाची सुखरूप सुटका करून त्याला आरपीएफ पुणे ठाण्यात संरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. जीआपी हाजीपूर येथून पोलीस पथक पुण्यात दाखल झाले असून ते बालक व आरोपीच्या ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करीत आहेत.
गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीसांचा ‘ॲक्शन प्लॅन’
सायबर गुन्ह्यांची वाढती व्याप्ती तसेच एकाच पोलीस ठाण्यावर येणारा ताण लक्षात घेऊन नव्याने ५ सायबर पोलिस ठाणे निर्मितीसाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे पोलिसांकडून तसा प्रस्ताव महासंचालक कार्यालयाला पाठविला जाणार असून, प्रत्येक झोनला एक सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. तर, मनुष्यबळाची मागणी देखील करण्यात येणार आहे.