राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. मत महिलेच्या गळ्याला रुमाल बांधलेला होत आणि गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. मृत महिलेचं नाव सपना मीना आहे. सपनाच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून यासंदर्भात तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी याच प्रकरणातील आरोपीचा शोध ८ दिवसात घेतल्याचं सांगितलं जात आहे.
सातारा-सांगली जिल्ह्यातून दोन सराईत गुन्हेगार तडीपार; दोन वर्षांसाठी केली गेली मोठी कारवाई
कसा केला तपास?
पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी पोलिसांची एक टीम तयार केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांनी 500 हून अधिक सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि टेक्निकल तपासाच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर, पोलिसांना तपासादरम्यान एक महत्त्वाचा पुरावा सापडला आणि घंटाली येथील रहिवासी बालुराम मीणा अशी आरोपीची ओळख समोर आली. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आणि त्याची कठोर चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला.
का केली हत्या?
आरोपी हा आर्थिक अडचणीत होत त्यावेळी त्याने सपना मीणा नावाच्या महिलेकडून पैसे उधार घेतले होते. आरोपीने सपनाचे दागिने गहाण ठेवले आणि त्यातून मिळालेले पैसे लंपास केले होते. मात्र सपनाने तिचे पैसे आरोपीकडे परत मागितले तेव्हा बालुरामने तिच्या हत्येचा कट रचला.
कशी केली हत्या ?
आरोपीने सपनाला पैसे परत करण्याच्या बहाण्याने तिला निर्जन शेतात बोलावलं आणि तिथेच गळा दाबून तिची हत्या केली. महिलेच्या हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
पीडितेजवळ मोबाईल फोन नसल्यामुळे तिच्या हत्येचं प्रकरण सोडवणं खूप अवघड होतं. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून हत्येशी संबंधित बऱ्याच बाबींचा शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे.
सुनेचा मृतदेह पाहताच सासूला बसला जबर धक्का; काही क्षणांत सासूने सोडले प्राण
राजस्थानमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुनेच्या मृत्यूने सासूला जोरदार धक्का बसला आणि एवढेच नाही तर क्षणातच तिचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ही घटना अजमेर जिल्ह्यातील सरवाड कसब्यात घडली आहे.
सुनेचे नाव अनिता तर सासूचे नाव अन्नपूर्णा देवी (वय 70) असे आहे. अनिताचा मृत्यू आजाराने झाला. घरात अनिताचा मृतदेह पोहोचताच त्यांच्या सासू अन्नपूर्णा देवी या सुनेला पाहून शोकाकुल झाला. त्या सुनेच्या पार्थिव देहाजवळ बसून रडत होत्या. घरच्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्यांना भोवळ आली आणि ते पडल्या. कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. एकाच दिवशी सासू- सुनेच्या मृत्यूने परिसरात हळहळ पसरली.
Accident: नंदूरबार आणि समृद्धी महामार्गावर दोन भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी